शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सहा ऊसतोड मजुरांचा कालव्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: February 20, 2015 01:21 IST

ट्रॅक्टर कालव्यात उलटून बुधवारी झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या सातपैकी सहा जणांचे मृतदेह गुरुवारी कालव्यात तरंगताना आढळले. ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू आहे.

टेंभुर्णी (सोलापूर) : उजनी कालव्याच्या पुलावरून नगर जिल्ह्यातील दहिगावाचे ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर कालव्यात उलटून बुधवारी झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या सातपैकी सहा जणांचे मृतदेह गुरुवारी कालव्यात तरंगताना आढळले. ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू आहे. ट्रॅक्टरचा पाठलाग करणाऱ्या व दुर्घटनेस जबाबदार असणारे मुकादम (टोळीमालक) बाळासाहेब सोपान चंदनकर व बळीराम चंदनकर यांच्यावर टेंभुर्णी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुर्घटनेच्या ठिकाणापासून एका किलोमीटरवर रांझणी गावाजवळील पुलाजवळ शुभम बाळासाहेब गुंजाळ (५) याचा मृतदेह तरंगताना आढळला. तेथून पुढे काही अंतरावर हिरा राजू मोरे (२५), अर्जुन राजू मोरे (६) या मायलेकांचे मृतदेह आढळले. अकलूजजवळ कविता बाळासाहेब गुंजाळ (२५) व रांझणी पुलाजवळ कार्तिक राजू मोरे (४) आणि सुरेखा अंबादास गुंजाळ (३०, सर्व रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांचे मृतदेह सापडले. (प्रतिनिधी)गावाकडे जाताना काळाचा घालासंबंधित मजूर तीन महिन्यांपासून आलेगाव (ता. माढा) येथील बाळासाहेब सोपान चंदनकर यांच्याकडे ऊसतोड करत होते. दररोज काम मिळत नसल्याने मुकादमाकडून घेतलेले पैसे कसे फेडणार, असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळे मुकादमाची नजर चुकवून हे मजूर दहिगावकडे निघाले होते. चंदनकर यांना हे समजताच त्यांनी मध्यरात्री ट्रॅक्टरचा पाठलाग केला. मात्र ते पाठलाग करत असल्याने घाबरलेल्या चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर कालव्यात उलटला.