साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 06:47 IST2025-08-25T06:47:07+5:302025-08-25T06:47:32+5:30

ST Bus News: पासची मुदत संपली म्हणून पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवले. माणुसकीला लाजवणारी ही घटना चोपडा तालुक्यातील उनपदेव - अडावद या गावादरम्यान १९ ऑगस्टला सकाळी घडल्याची बाब समोर आली आहे.

Sir! Will a fifth-grade student get off the bus in the pouring rain just because his pass has expired? | साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

- पी. आर. माळी
चोपडा (जि. जळगाव) - पासची मुदत संपली म्हणून पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवले. माणुसकीला लाजवणारी ही घटना चोपडा तालुक्यातील उनपदेव - अडावद या गावादरम्यान १९ ऑगस्टला सकाळी घडल्याची बाब समोर आली आहे. बादल राजाराम बारेला (रा. उनपदेव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. उनपदेवनजीक असलेल्या पाड्यावर तो राहतो. तिथून रोज सहा किमी अंतरावर असलेल्या अडावद येथील शाळेत जात असतो.

घटनेची चौकशी करण्याची मागणी 
दरम्यान, या घटनेविषयी कर्जाणे येथील उपसरपंच प्रमोद बारेला आणि बिरसा ब्रिगेड सातपुडाचे अध्यक्ष रामदास पावरा यांनी चोपडा येथील आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. 

पायपीट करून आला घरी
विद्यार्थी उनपदेव-आडगाव- चोपडा बसने शाळेत जाण्यासाठी निघाला. परंतु त्याच्याकडील मासिक पास १७ ऑगस्टला संपली होती. पैसे नसल्याने त्याने पासचे नूतनीकरण केले नव्हते. उनपदेव येथून बस दोन ते तीन किमी पुढे निघाली.

वाहकाने त्याला तिकिटाविषयी विचारले असता. पास संपल्याचे त्याने सांगितले. यावर वाहकाने त्याला अपशब्द वापरले आणि एका ठिकाणी थांबवून भरपावसात खाली उतरवले. पावसात भिजत हा विद्यार्थी दोन ते तीन किमी पायी चालून उनपदेवनजीक पाड्यावर आपल्या घरी परतला.

शाळकरी मुलाला भरपावसात बेजबाबदारपणे रस्त्यात उतरवून देणे हा अमानुषपणा आहे. या प्रकाराची चौकशी करावी. तसेच आदिवासी मुलांसाठी वेगळी बस उपलब्ध करून देण्यात यावी.
- प्रमोद बारेला, उपसरपंच, कर्जाणे, 
ता. चोपडा. 

घडलेल्या या प्रकाराबाबत संबंधित बसमधील वाहकाबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे. ती तक्रार विभागीय पातळीवर पाठवली आहे. त्याची चौकशी होऊन पुढील कारवाई करता येईल. 
- महेंद्र पाटील, आगार प्रमुख, चोपडा.

Web Title: Sir! Will a fifth-grade student get off the bus in the pouring rain just because his pass has expired?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.