भाजपाकडे सक्षम उमेदवार नाहीत, त्यामुळेच ते दुसऱ्या पक्षांतील उमेदवारांची चोरी करताहेत, नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 06:52 PM2024-03-07T18:52:56+5:302024-03-07T18:53:27+5:30

Nana Patole Criticize BJP:

Since BJP does not have competent candidates, theft of candidates from other parties, gangs of various gangs | भाजपाकडे सक्षम उमेदवार नाहीत, त्यामुळेच ते दुसऱ्या पक्षांतील उमेदवारांची चोरी करताहेत, नाना पटोलेंचा टोला

भाजपाकडे सक्षम उमेदवार नाहीत, त्यामुळेच ते दुसऱ्या पक्षांतील उमेदवारांची चोरी करताहेत, नाना पटोलेंचा टोला

मुंबई -  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षात आता सक्षम उमेदवार नाहीत म्हणून तर ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत. भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयही यासाठी कामाला लागले आहेत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षात आता सक्षम उमेदवार नाहीत म्हणून तर ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत. भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयही यासाठी कामाला लागले आहेत. भाजपा आता मोदी परिवार झाला असून जिंकण्याचा विश्वासही त्यांच्यात राहिलेला नाही. राष्ट्रीय नेतृत्व म्हणणाऱ्या नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळेल की नाही हीच शंका आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाव असायला पाहिजे होते पण नाही. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे व यावर्षी विजयी पताका फडकवू तसेच सांगलीची जागासुद्धा काँग्रेस लढणार आहे, असे नाना पटोले म्हणाले. 

खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल व १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित असतील व लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली, या बैठकीनंतर पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. शिवाजी पार्क मिळेल अशी अपेक्षा असून  राज्य सरकार अश्यात राजकारण करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. भारत जोडो न्याय यात्रा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भूमीत येत आहे.  या महापुरुषांच्या विचारांना संपवण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजपा सरकार करत आहे. भाजपा लोकशाही व संविधान संपवायला निघाले आहे परंतु त्यांना जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे.

Web Title: Since BJP does not have competent candidates, theft of candidates from other parties, gangs of various gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.