शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिमकार्ड डीलर गजाआड

By admin | Updated: January 31, 2015 05:25 IST

बोगस कागदपत्रे तयार करून त्याआधारे विविध कंपन्यांकडून सिमकार्ड घेऊन ती विकणाऱ्या शरीफ खान (२६) या डीलरला ट्रॉम्बे पोलिसांनी

मुंबई : बोगस कागदपत्रे तयार करून त्याआधारे विविध कंपन्यांकडून सिमकार्ड घेऊन ती विकणाऱ्या शरीफ खान (२६) या डीलरला ट्रॉम्बे पोलिसांनी चिता कॅम्प येथून गजाआड केले. त्याच्याकडून तब्बल २१७३ सिमकार्ड सापडली. त्यापैकी १७७७ कार्ड रिलायन्स व टाटा डोकोमो या कंपन्यांची असून ती अ‍ॅक्टिव्हेटेड असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली.याहून धक्कादायक बाब म्हणजे शरीफ हा गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानसह बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, नायजेरिया, म्यानमार, ट्युनिशिया या देशांमधील अज्ञात व्यक्तींसोबत चॅट करत होता. ही माहिती समोर येताच ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने प्रकरण गांभीर्याने हाताळून सर्वप्रथम आपल्या वरिष्ठांना ही बाब कळवली. ट्रॉम्बे चिता कॅम्पमधील एक किरकोळ सिमकार्ड डीलर या सात देशांमधील अज्ञात व्यक्तींशी कशासाठी संपर्कात होता, तो त्यांच्याशी काय चर्चा करत होता, शरीफ दहशतवाद्यांच्या संपर्कात तर नव्हता हे जाणून घेण्यासाठी, या बाबी पडताळण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी एक विशेष पथक स्थापन केले आहे. शरीफचे गूढ उकलण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस), मुंबई क्राइम ब्रांच, सायबर सेल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अन्सार पिरजादे, एपीआय वैजनाथ उपासे यांना त्यांच्या खबऱ्याने शरीफने सुरू केलेल्या गौडबंगालाची माहिती दिली. ही माहिती मिळताच उपासे व पथकाने शरीफवर पाळत ठेवली. त्याची संपूर्ण माहिती मिळवून चौकशीसाठी ताब्यात घेतले. घराची झाडाझडती घेतली. त्यातून २१७३ सिमकार्डांसोबत असंख्य बोगस आधार कार्ड व मतदान ओळखपत्रे सापडली. शरीफ तूर्तास पोलीस कोठडीत असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)