शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्टीरेबिजसाठी दाखवा बीपीएलचे कार्ड

By admin | Updated: September 28, 2015 02:33 IST

शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कुत्र्यांचे हल्ले व त्यात अ‍ॅन्टीरेबिजची लस मेडिकल प्रशासन फक्त बीपीएल रुग्णांसाठीच उपलब्ध करून देत

नागपूर : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कुत्र्यांचे हल्ले व त्यात अ‍ॅन्टीरेबिजची लस मेडिकल प्रशासन फक्त बीपीएल रुग्णांसाठीच उपलब्ध करून देत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेडिकलमध्ये या नियमाचा फटका दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) आणि सामान्य रुग्णांना बसत आहे. श्वान चावल्यानंतर प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अ‍ॅन्टीरेबिज लस असते. मेडिकल प्रशासन फक्त दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) रुग्णांसाठीच ही लस उपलब्ध करून देते. दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) कार्डधारकांसह इतर रुग्णांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते किंवा महापालिकेच्या रुग्णालयाकडे बोट दाखविले जाते. विशेष म्हणजे, मेडिकलपासून काही अंतरावर असलेल्या मनपाच्या आयसोलेशनमध्ये अशा रुग्णांची गर्दी वाढल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. आता महाल येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात आणि इंदिरा गांधी इस्पितळात ही सेवा उपलब्ध आहे. मेडिकलपासून ही दोन्ही इस्पितळे बरीच लांब आहेत. यातच ही लस ३०० ते ४०० रुपयांची असल्याने गरीब रुग्ण अडचणीत येतो. विशेष म्हणजे, महापालिकेच्या इस्पितळांवर ग्रामीण रुग्णांचाही भार राहत असल्याने तुटवडा नेहमीच पडतो. यावर उपाय म्हणून मेडिकलमध्ये सर्व रुग्णांसाठी ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून आहे. (प्रतिनिधी)