धक्कादायक ! राज्यात मानवी तस्करीच्या होताहेत सर्वाधिक घटना; मुंबई आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 11:31 AM2020-10-05T11:31:36+5:302020-10-05T11:32:56+5:30

जागतिक वेश्या व्यवसाय विरोधी दिन विशेष: वर्षभरात १ हजार महिलांची सुटका 

Shocking! The highest incidence of human trafficking is in the state; mumbai on top | धक्कादायक ! राज्यात मानवी तस्करीच्या होताहेत सर्वाधिक घटना; मुंबई आघाडीवर

धक्कादायक ! राज्यात मानवी तस्करीच्या होताहेत सर्वाधिक घटना; मुंबई आघाडीवर

Next
ठळक मुद्दे२०१९ मध्ये महाराष्ट्रात वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करीचे सर्वाधिक ६१४ गुन्हे दाखल

- विवेक भुसे- 
पुणे : वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी सर्वाधिक प्रमाणात होत असून देशभरात सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नोंदविल्या जात आहे. देशभरात होणाऱ्या मानवी तस्करीच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा वाटा १२.८ टक्के इतका आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश (१० टक्के) आणि कर्नाटक (८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रात १ हजार २० जणींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये ९४६ हून अधिक महिला, मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आले होते.सुटका करण्यात आलेल्या ९७८ महिलांपैकी ८७६ या देशाच्या विविध भागातील होत्या. तर ३१ बांगला देशी आणि ३१ इतर देशातील होत्या़ महाराष्ट्र पोलिसांनी ६५८ जणांना अटक केली होती. त्यापैकी ४०७ जणांविरुद्ध दोषारोपपत्र पाठविण्यात आले होते. परंतु, त्यापैकी केवळ एकाला शिक्षा लागली आहे. 


२०१९ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६१४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या खालोखाल आसाममध्ये १७३, मध्य प्रदेश ११८, पश्चिम बंगाल ११५, केरळ १०८, कर्नाटक ९६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.
महाराष्ट्रात प्रामुख्याने नेपाळ, बांगला देश, पश्चिम बंगाल या भागातून नोकरीच्या आमिषाने तरुणींना मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. ही मानवी तस्करी रोखण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. असे असले तरी या व्यापारात गुंतलेल्यांची मोठी साखळी देशभर कार्यरत आहे. ती मोडून काढणे अजून शक्य झालेले नाही.
देशातील मोठ्या शहरातील गुन्ह्यांच्या विचार करता मुंबईमध्ये सर्वाधिक ३११ मानवी तस्करीचे गुन्हे २०१९ मध्ये नोंदविण्यात आले होते. त्याखालोखाल दिल्ली (९७), बंगलुरु (८१), इंदौर (६७) पाठोपाठ पुणे (६५) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

Web Title: Shocking! The highest incidence of human trafficking is in the state; mumbai on top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app