शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहलीसाठी गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू

By admin | Updated: February 2, 2015 05:05 IST

शाळेच्या सहलीमध्ये धमाल-मस्ती करीत असताना शॉक लागून एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मालाड येथे घडली.

मुंबई : शाळेच्या सहलीमध्ये धमाल-मस्ती करीत असताना शॉक लागून एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मालाड येथे घडली. सय्यद जाफरी असे या मृत मुलाचे नाव असून, तो गोवंडीच्या जाफरी इंग्लिश हायस्कूलमधील दहावीचा विद्यार्थी होता. गोवंडी-शिवाजीनगर येथील प्लॉट नंबर २९ येथे हे जाफरी इंग्लिश हायस्कूल आहे. दरवर्षाप्रमाणे शाळेची शैक्षणिक सहल काढण्याची योजना शाळेकडून महिनाभरापूर्वीच आखण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी शाळेतील ३२४ विद्यार्थ्यांसह १९ शिक्षक मालाडमधील सायना रिसॉर्टमध्ये दाखल झाले. रिसॉर्टमध्ये सर्व मुले खेळत असतानाच सय्यद जाफरी हा अचानक एका झाडाजवळ पडला. काही विद्यार्थ्यांनी ही बाब शिक्षकांच्या कानावर घातल्यानंतर त्याला आकडी आली असावी, असे त्यांना वाटले. त्यामुळे रिसॉर्टमधील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने या मुलाला मढ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल  केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मालवणी पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. प्राथमिक तपासात हा मृत्यू कशाने झाला याबाबत काहीच कल्पना नसल्याने पोलिसांनी हा मृतदेह भगवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. आज पोलिसांकडे हा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सय्यदचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी त्याच्यासोबत असलेल्या काही मित्रांकडे चौकशी केली असता, तलावात पोहून झाल्यानंतर तो रिसॉर्टमध्येच एका आंब्याच्या झाडावर कैऱ्या काढण्यासाठी चढला होता. मात्र तो कसा खाली पडला याबाबत काहीच माहीत नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र या आंब्याच्या झाडाजवळून काही विजेच्या उघड्या तारा होत्या. या विजेच्या झटक्यानेच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मालवणी पोलिसांनी सायना रिसॉर्ट चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. > गोवंडीत शोकाकूल वातावरणशिवाजीनगर परिसरातील प्लॉट नंबर १७ येथे सय्यद आई आणि त्याच्या दोन मोठ्या बहिणींसोबत राहत होता. त्याचे वडील कामानिमित्त आखाती देशात आहेत. नेहमी हसमुख आणि सर्वांमध्ये मिसळणाऱ्या सय्यदच्या निधनाची बातमी समजताच सर्वांना मोठ्ठा धक्का बसला. शिवाय दोन बहिणींनंतर हा एकच मुलगा असल्याने कुटुंबीयांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला. (प्रतिनिधी)