''महाआघाडी सरकार, हप्ता चालू काम बंद'' किरिट सोमय्यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 16:23 IST2019-12-21T16:22:17+5:302019-12-21T16:23:08+5:30

किरिट सोमय्या In Action, अजब आहे उद्धव तुझे सरकार

Shivsena MahaAghadi Govt "Hapta Chalu Kam Bandh", Say Kirit Somaiya | ''महाआघाडी सरकार, हप्ता चालू काम बंद'' किरिट सोमय्यांची बोचरी टीका

''महाआघाडी सरकार, हप्ता चालू काम बंद'' किरिट सोमय्यांची बोचरी टीका

आधीच्या सरकारच्या विकास कामांना स्थगिती देण्याचा सपाटा महाविकास आघाडीच्या सरकारनं लावला असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार केला जात आहे. त्यात भाजपाचे वरिष्ठ नेते किरिट सोमय्या यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाआघाडीचं सरकार, हप्ता चालू काम बंद, असं असल्याची टीका सोमय्या यांनी केली. 

ते म्हणाले की,''अजब आहे उद्धव तुझे सरकार. शिवसेना महाआघाडीनं आता नवीन घोषणा दिली आहे. काम बंद हप्ता चालू.. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पनवेल, नवी मुंबई, मिरा भाईंदर येथील सर्व ठिकाणाची काम बंद आहेत. सगळ्या ठिकाणच्या कंत्राटदारांना निरोप जात आहेत. येऊन भेटा म्हणून...''




 

Web Title: Shivsena MahaAghadi Govt "Hapta Chalu Kam Bandh", Say Kirit Somaiya