शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे व्यक्तीमत्व बहुआयामी - नरेंद्र मोदी

By admin | Updated: December 24, 2016 18:40 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर या क्षणी मला अत्यंत आनंदाची अनुभूती होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 24 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर या क्षणी मला अत्यंत आनंदाची अनुभूती होत आहे. 2014 मध्ये भाजपाने निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यावेळी सर्वप्रथम मी रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले असे नरेंद्र मोदींनी वांद्रे-कुर्ला संकुलातील जाहीर सभेमध्ये बोलताना सांगितले. 
 
शिवरायांचा जीवनपट प्रेरणादायी असून, त्यांच्या व्यक्तीमत्वातून भरपूर काही शिकण्यासारखे असल्याचे मोदींनी सांगितले.  शिवाजी महाराज शूर, वीर होते. संघर्षाच्या काळातही त्यांनी सुशासन सुरु ठेवले. त्यांनी सुशासनाची उत्तम परंपरा घालून दिली. मावळयांची मोट बांधून स्वराज्याचा लढा उभारला, शिवाजी महाराजांकडे उत्तम संघटनकौशल्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याच्या नियोजनाचे केलेले काम आजही प्रेरणादायी, शिकण्यासारखे आहे असे मोदी म्हणाले. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी आरमाराचे महत्व ओळखले आणि आरमाराची स्थापना केली. मुद्रा निर्मितीचे कामही महाराजांनी परदेशी हातात जाऊ दिले नाही. त्यामुळे काय धोके निर्माण होऊ शकतात हे ओळखून मुद्रा निर्मितीचे कार्यही स्वराज्यातच केले. शिवरायांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. आज मला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाची संधी मिळाली त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा, सरकारचा आभारी आहे असे मोदी म्हणाले.