काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता अनेक राज्यंच भाजपामुक्त झाली; शिवसेनेचा भाजपावर बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 08:35 AM2019-12-24T08:35:09+5:302019-12-24T08:36:48+5:30

झारखंडच्या जनतेनं भूलथापा, आमिषांना नाकारलं; शिवसेनेचा भाजपावर बाण

shiv sena slams bjp president amit shah pm narendra modi after jharkhand debacle | काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता अनेक राज्यंच भाजपामुक्त झाली; शिवसेनेचा भाजपावर बाण

काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता अनेक राज्यंच भाजपामुक्त झाली; शिवसेनेचा भाजपावर बाण

Next

मुंबई: झारखंडच्या जनतेनं भूलथापा आणि आमिषांना बळी पडण्याचं नाकारलं. लोकांनी ठरवलं की ते सत्ता, दबाव आणि आर्थिक दहशतवादाची पर्वा करत नाहीत, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं सामनामधून भाजपाला लक्ष्य केलं आहे. भाजपालाझारखंडमधील सत्ता गमवावी लागल्यानंतर शिवसेनेनं त्यांच्या जुन्या मित्रपक्षाला लक्ष्य केलं आहे. झारखंड बेडरपणे बदलाला सामोरं गेलं. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावलं. हे असं का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरलं की, वेगळं काय घडणार, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. 

झारखंडमधूनही भारतीय जनता पक्षाचं राज्य गेलं आहे. आधी महाराष्ट्र भाजपाच्या हातातून गेला, आता झारखंडदेखील गेलं. महाराष्ट्र व झारखंड या राज्यांची तुलना करता येणार नाही. मात्र भाजपनं आणखी एक राज्य गमावलं. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ राबवूनही झारखंड भाजपला राखता आलं नाही. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होतील. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी बहुमताचा आकडा गाठणार हे स्पष्ट आहे. या आघाडीत सर्वाधिक जागा झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाल्या आहेत. काँग्रेसनंही दोन आकडी टप्पा गाठला आहे, तर राजदलाही पाच-सात जागा मिळाल्या आहेत. थोडक्यात, काँग्रेस-राजदच्या पाठिंब्यावर झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार तेथे येत आहे. हे भाजपसाठी धक्कादायक आहे. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानची घोषणा भाजपचे नेते करत होते, पण अनेक राज्यंच भाजपमुक्त झाली, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

2018 साली भाजप साधारण 75 टक्के प्रदेशांत सत्ता ठेवून होती. आता घसरगुंडी झाली आहे व जेमतेम 30-35 टक्के प्रदेशांत भाजपची सत्ता दिसत आहे. भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारं आहे. 2018 ला देशातील 22 राज्यांत भाजपची सत्ता होती. ईशान्येकडील राज्यांतही भाजप घुसली. अगदी त्रिपुरा, मिझोरामपर्यंत त्यांचे झेंडे फडकले, पण आज त्रिपुरात निवडणुका घेतल्या तर तेथील जनता भाजपची सत्ता उलथवून लावील अशी स्थिती आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भात सगळ्यात जास्त त्रिपुरात हिंसाचार झाला व तो रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरलं. हे संपूर्ण देशातच घडताना दिसत आहे, असं म्हणत भाजपाचा समाचार घेण्यात आला आहे. 
 

Web Title: shiv sena slams bjp president amit shah pm narendra modi after jharkhand debacle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.