शिंदेसेनेने दिली होती ऑफर अन् रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम; उदय सामंत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:49 IST2025-03-10T12:48:46+5:302025-03-10T12:49:11+5:30

Uday Samant Reaction Over Ravindra Dhangekar Decision: गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र धंगेकर काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. यावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

shiv sena shinde group uday samant first reaction over ravindra dhangekar take decision left congress | शिंदेसेनेने दिली होती ऑफर अन् रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम; उदय सामंत म्हणाले...

शिंदेसेनेने दिली होती ऑफर अन् रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम; उदय सामंत म्हणाले...

Uday Samant Reaction Over Ravindra Dhangekar Decision: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. परंतु, रवींद्र धंगेकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले होते. मात्र, या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिलेला आहे.

रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाला रामराम करत असल्याची माहिती दिली. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याकडे काहीही मागितलेले नाही. काँग्रेस सोडताना मला दु:ख होत आहे. शिंदेंसह काम करायला हरकत नाही. सत्तेत जाऊन काम करण्याची इच्छा माझ्या कार्यकर्त्यांची आहे. याआधी शिंदे माझ्याबाबतीत बोलले आहेत, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. तर काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकर यांना ऑफर दिली होती. यासंदर्भात आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

रवींद्र धंगेकर आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत

उदय सामंत यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली होती. पण ती भेट वेगळ्या कामांसाठी घेतली होती. मला तुमच्या माध्यमातून समजते आहे की, रवींद्र धंगेकर आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. मराठवाड्यात जी ठाकरे गटाकडून निवडणूक लढली, शरद पवार गटाकडून लढली, ज्यांनी दीड लाख मतं घेतली ते नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेहमी आभार मानतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिली. काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले. एखादा पक्ष सोडणे खूप कठीण असते. पण कार्यकर्ते आणि मतदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी या आधी दोन तीन वेळा फोन केला होता. उदय सामंत यांनीही मला फोन केला होता. आमच्यासोबत काम करा असे त्यांनी सांगितले होते, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

 

Web Title: shiv sena shinde group uday samant first reaction over ravindra dhangekar take decision left congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.