shiv sena sanjay raut slams bjp prakash javadekar over vaccine shortage coronavirus maharashtra | दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर देत असलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : संजय राऊत

दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर देत असलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : संजय राऊत

ठळक मुद्देदेशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातीलही परिस्थिती बिकट होत आहे : संजय राऊतलॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले, राऊत यांचं वक्तव्य

संजय राऊत यांनी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला. "प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी. त्यांचंही महाराष्ट्राशी नातं आहे," असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना टोला लगावला. माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रकाश जावडेकरांवरही टीका केली. 

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. परंतु राज्यातील जनतेचं म्हणणं असल्याचं सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. "फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केलाही असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का?," असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. 

देशातील परिस्थिती हाताबाहेर

 “सध्या देशातंर्गत युद्ध आहे. सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी कोरोनामुळे आजारी आहेत याची फडणवीसांना माहिती असेल. मोठ्या व्यक्ती महाराष्ट्रातील जनता कोरोनाशी झूंज देत आहे. महाराष्ट्राचे म्हणून एकत्र आलं पाहिजे. आपल्या कोरोना होणार नाही आणि विरोधकांनाच तो होईल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी डोक्यातू काढलं पाहिजे. देशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातीलही परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य सर्वांना समजावलं. तसंच लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी संकेत दिले, असंही राऊत म्हणाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shiv sena sanjay raut slams bjp prakash javadekar over vaccine shortage coronavirus maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.