शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

ट्रोल तर होणारच ना ! भोसरीतील भाजपा आमदाराच्या भावाने केले आंदोलनासाठी मुलांना उन्हात उभे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 9:13 PM

कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपाने शुक्रवारी राज्यभरात 'मेरा आंगण, मेरा रणांगण' : महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले.

ठळक मुद्देआदित्य ठाकरे, धनंजय मुंडे आदी नेत्यांनीही या प्रकाराचा निषेध करत भाजपावर टीका पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाच्या आंदोलनापेक्षा हाच विषय अधिक चर्चेचा ठरला

पिंपरी : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा भाजपा आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या भावाने आपल्या कुटूंबातील लहान मुलांना भर उन्हात उभे केले. आमदारांच्या भावाने लहान मुलांसह केलेल्या आंदोलनाचा फोटो चांगलाच ट्रोल झाला आहे. शिवसेनेचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आदी नेत्यांनीही या प्रकाराचा निषेध करीत भाजपाच्या नेत्यावर टीका केली आहे.कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपाने आज (शुक्रवारी) राज्यभरात ठिकठिकाणी ''मेरा आंगण, मेरा रणांगण'': महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले. राज्यातील अनेक नेत्यांनी सोशल डिस्टंन्सिंग करत आंदोलन केले. तसेच काळ्या रंगाचे मास्क, शर्ट, रिबीन, फलक घेऊन नेत्यांनी सरकारचा निषेध केला. मात्र पिंपरी -चिंचवडमधील भाजपा आमदाराच्या एका भावाने घरातील लहान मुलांना कडकडीत उन्हात उभे करत हे आंदोलन केले. विशेष म्हणजे सोशल काही मुलांनी मास्कही घातले नव्हते. तर दहा वर्षांखालील मुलांना घराबाहेर बंदी असतानाही त्याचे पालन न करता या आंदोलनात सहभाग नोंदविला.

हा प्रकार समोर आल्यानंतर पर्यटनमंत्री यांनी हा फोटो ट्विट करत भाजपावर सडकून टीका केली. भाजपा नेत्यांना सत्तेचा इतका हव्यास निर्माण झाला आहे की, त्यांनी आपल्या मुलांनाही भर उन्हात उभ केल्याच ट्विटमध्ये म्हटले आहे.  जग सर्व काही विसरून एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत असताना, हा पक्ष भीती, द्वेष आणि फूट पाडण्याचे काम करत आहे. भाजपाचे नेते कोरोनाचं संकट विसरून गेले आहेत, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हा फोटो ट्विट करत सत्तेसाठी हे लोक आपल्या मुलांचे जीवही धोक्यात घालायला तयार असल्याची टिका केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाच्या आंदोलनापेक्षा हाच विषय अधिक चर्चेचा ठरला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसState Governmentराज्य सरकारDhananjay Mundeधनंजय मुंडे