शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 09:10 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांच्या मुलाखतीचा टीझर ट्विट

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत शनिवारपासून पाहायला मिळणार आहे. तीन भागांमधील या मुलाखतीचा टीझर संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. यामध्ये शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. शरद पवार यांची मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे या मुलाखतीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादक असलेल्या संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी कोरोना, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावा लागलेला लॉकडाऊन, याबद्दलची मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळी असलेली भूमिका अशा विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यासोबतच राम मंदिर आंदोलनासारख्या संवेदनशील विषयावरही भाष्य केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात जवळपास महिनाभर सत्तासंघर्ष सुरू होता. त्यात स्वत: शरद पवार किंगमेकर ठरले. त्यावेळी झालेल्या राजकारणावरही पवार यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. काल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुलाखतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांची मुलाखत घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.शरद पवार यांनी मुलाखतीत देशाबद्दलच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चीनसोबतच्या तणावाचा विशेष उल्लेख केला. सध्या चीनसोबतचे संबंध विकोपाला गेले आहेत. चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत आपले २० जवान शहीद झाले. ज्या भागात ही झटापट झाली, तिथे गोळी झाडता येत नाही. हा करार पवार संरक्षणमंत्री असताना झाला होता. अशा अनेक गोष्टींवर पवारांनी भाष्य केलं आहे. पवारांकडे असलेलं माहितीचं भांडार देशातील लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. आज देशामध्ये त्यांच्या उंचीचा नेता मला दिसत नाही. पन्नासपेक्षा जास्त वर्षांची त्यांची संसदीय कारकीर्द आहे. ते अजिंक्य आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी पवारांचं कौतुक केलं.देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा'मी पाहिलेले पवार वेगळे, त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले'; राऊतांचा खुलासा"लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही"अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात! धुसफुशीवरून संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिरNCPराष्ट्रवादी काँग्रेस