शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यात आजही उत्तम संबंध, परंतु... : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 00:02 IST

यापूर्वी ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली होती भेट. राज्यातील महत्त्वाच्या चर्चांनंतर मुख्यमंत्री, पंतप्रधानांमध्ये झाली होती वैयक्तीक चर्चा.

ठळक मुद्देयापूर्वी ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली होती भेट. राज्यातील महत्त्वाच्या चर्चांनंतर मुख्यमंत्री, पंतप्रधानांमध्ये झाली होती वैयक्तीक चर्चा.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी वैयक्तीक चर्चाही केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध उत्तमच आहेत. राजकारण एक निराळी बाब आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय राऊत यांच्या जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. यावरून शिवसेना आणि भाजप एकत्र येतील अशा शक्यता वर्तवल्या जाऊ नये. आमचे मार्ग निराळे आहेत. परंतु ठाकरे कुटुंबीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध उत्तम आहेत. राजकारण हे निराळं आहे. परंतु वैयक्तिक सबंध उत्तम आहेत," असं राऊत म्हणाले. एनडीटीव्हीशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. "शरद पवार यांना पाहा, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आम्ही असे लोक आहोत जे नाती कायम जपतो," असंही त्यांनी नमूद केलं. 

निवडणुकांचं वचनबद्ध नव्हतो"महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे विचार निराळे आहेत. परंतु हे सरकार पाच वर्ष चालेल हे आमचं वचन आहे. कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं. ते ठीक आहे. आम्ही निवडणुका सोबत लढण्यासाठी वचनबद्ध नाही. आम्ही सरकार चालवण्यासाठी वचनबद्ध आहोत. तीन वर्षांनंतर कोण कशाच्या जोरावर निवडणुका लढवणार ते पाहू. सरकार चालतंय आणि चालत राहिल. निवडणुका आल्यानंतर पाहू," असं त्यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना सांगितलं. 

मराठा आरक्षणात केंद्रानं हस्तक्षेप करावामराठा आरक्षणाबाबत बोलताना राऊत यांनी केंद्रानं या प्रकरणी हस्तक्षेप करावा असं पंतप्रधानांना सांगितल्याचं म्हटलं. "पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे यांनी यावर चर्चा केली आहेत. यात राजकारण कुठे आलं? भाजर सध्या विरोधीपक्षात आहे. परंतु त्या पक्षातील नेत्यांशी आजही आमचे चांगले संबंध आहेत. राजकारण आणि नाती वेगवेगळी आहेत. ठाकरे कुटुंबीय आणि शरद पवार यांचेही कायम उत्तम संबंध होतं. आम्ही नाती जपणारी लोक आहोत," असं राऊत म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार