शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये शिवसेनेत दुफळी !

By admin | Updated: October 3, 2015 03:43 IST

महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आयुक्त हटाव मोहीम उघडली असताना सत्ताधारी शिवसेनेत मात्र दुफळी निर्माण झाली आहे

औरंगाबाद : महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आयुक्त हटाव मोहीम उघडली असताना सत्ताधारी शिवसेनेत मात्र दुफळी निर्माण झाली आहे. शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी त्यास स्पष्ट विरोध दर्शवित स्वार्थापोटीच ही मोहीम राबविली जात असल्याचा घणाघाती आरोप स्वकीयांवर केला आहे.पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधात भाजपासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड भूमिका घेतली आहे. महिनाभरापूर्वीही शिवसेना भाजपासह काँग्रेस आणि एमआयएमने आयुक्तांच्या विरोधात अविश्वासाची तयारी केली होती. परंतु त्या वेळी भाजपातील वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर ही मोहीम थंडावली. आता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांविरुद्ध नव्याने मोहीम उघडली असून, त्याला सेनेच्या मनपातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. तसेच सेनेचेच असलेले पालकमंत्री रामदास कदम यांनीही शुक्रवारी भाजपाच्या शिष्टमंडळाला आयुक्त हटाव मोहिमेस त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले.खा. खैरे यांनी मात्र विरोधात भूमिका घेतली आहे. खैरे यांनी मनपातील सेनेचे तसेच भाजपाचे पदाधिकारी स्वार्थापोटीच आयुक्त हटाव मोहीम राबवीत आहेत, असा आरोप केला. आयुक्तांच्या सेवानिवृत्तीला तीन महिने राहिले असताना त्यांना हटविणे चुकीचे आहे. शासन निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्याची बदली करीत नाही. प्रकरण ताणू नये, असे खैरे म्हणाले.खैरेंना डावललेमनपाच्या स्वच्छता सप्ताहाला शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सुरुवात झाली. परंतु खा. खैरे यांना या कार्यक्रमात डावलण्यात आले. मनपाच्या वतीने त्यांना निमंत्रणही दिले गेले नाही. खैरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, मला मनपातील कुणीही निमंत्रण दिले नाही. मग मी तरी कशाला जाऊ? मला रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी निमंत्रण दिले होते. त्यामुळे मी रेल्वे स्टेशनवरील स्वच्छता मोहिमेला गेलो होतो.