शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 15:29 IST

इतर पदाधिकाऱ्यांबद्दलचा अहवाल पक्षानं मागवला; कारवाईची शक्यता

ठळक मुद्देशिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होतेशिवसेना पक्षप्रमुखांनी कोकण दौऱ्यात नाणारला असलेल्या विरोधाचा पुनरुच्चार केला होताशिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी; इतर पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची शक्यता

सिंधुदुर्ग: नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यादरम्यान म्हटलं होतं. मात्र यानंतर लगेचच काही शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. त्यामुळे प्रकल्पाबद्दल शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणाची पक्षानं गंभीर दखल घेतली आहे. सागवे येथील शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांची उचलबांगडी केली आहे. याशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांचीदेखील हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (१७ फेब्रुवारी) शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. या  प्रकरणी विभागप्रमुख राजा काजवे यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काजवे यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकारी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबद्दलचा अहवाल पक्षाकडून मागवण्यात आला आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण?दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाणारबाबतची भूमिका स्पष्ट केली. नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये जाहिरात आली होती. पण जाहिरातदार शिवसेनेचं धोरण ठरवत नाहीत. शिवसेनेचे धोरण आणि भूमिका मी ठरवत असतो, असं ठाकरे म्हणाले. नाणार प्रकल्प बंद आहे. तो सुरू होणार नाही. जाहिरातीमुळे शिवसेनेची भूमिका बदलत नाही. बदलणार नाही. नाणारला विरोध हा कायमच राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.एका बाजूला उद्धव ठाकरे नाणारला विरोध असल्याचं निक्षून सांगत असताना दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. प्रकल्प पूर्ण करण्याची हीच ती वेळ असे फलकदेखील शिवसैनिकांच्या हातात होते. 'नाणार प्रकल्पाचे फायदे लक्षात आल्यानं आम्ही त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलो आहोत. या प्रकल्पामुळे दीड लाख रोजगार निर्माण होणार आहेत. मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. स्थलांतर कमी होणार आहे', असं शिवसैनिकांनी सांगितलं. काही सेवाभावी संस्थांनी स्थानिक शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आधी आमचा प्रकल्पाला विरोध होता. मात्र आता आम्ही या प्रकल्पाचं समर्थन करतो, असंदेखील ते पुढे म्हणाले होते.  

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना