शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

पीएम तुमचा, सीएम आमचा; शिवसेनेच्या मागणीनं युतीत नवा लोच्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 1:30 PM

शिवसेनेच्या मागणीमुळे युतीच्या चर्चेत नवा ट्विस्ट

नवी दिल्ली: व्हॅलेंटाईन वीक संपत आला, प्रॉमिस डे, हग डे गेला, व्हॅलेंटाईन डे आला तरी, युतीचं मनोमीलन काही झालेलं नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही शिवसेना-भाजपामध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरुच आहे. शिवसेना आणि भाजपाचे नेते एकमेकांना इशारे देत आहेत. मात्र पडद्याआड युतीची बोलणीदेखील सुरू आहे. मात्र अद्यापही या चर्चांना मूर्तस्वरुप आलेलं नाही. एका बाजूला शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेनं नवी मागणी केली आहे. शिवसेनेच्या नव्या मागणीमुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएत असणारे पक्ष त्यांच्या राज्यात भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. 'एनडीएनं 2019 मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावं,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे युतीच्या बोलणीत नवं वळण येऊ शकतं. शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती कालच समोर आली होती. मात्र अद्याप याबद्दल दोन्ही पक्षांकडून कोणीही अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपा 25, तर शिवसेना 23 जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा 145, तर शिवसेना 143 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच मोठा भाऊ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. युतीचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे तीन दिग्गज नेते लवकरच मातोश्रीवर जाणार आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे तीन बडे युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचं समजतं. मात्र आता शिवसेनेनं थेट मुख्यमंत्रीपद मागितल्यानं युतीचं काय होणार, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाprime ministerपंतप्रधानChief Ministerमुख्यमंत्रीSanjay Rautसंजय राऊतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९