शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंचे आमदार संतप्त; जेवढे अधिकार तेवढेच बोला, शिरसाट यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 05:50 IST

भाजपच्या मुंबई जिल्हा प्रसिद्धिप्रमुखांच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपासंदर्भात विधान केले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील आमदार भडकले आहेत. तर दुसरीकडे बावनकुळे यांनीही वक्तव्यावर सारवासारव केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविणार, तर ४८ जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देणार, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यात दम नाही. फक्त ४८ जागा लढविण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का, असा संतप्त सवाल शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.भाजपच्या मुंबई जिल्हा प्रसिद्धिप्रमुखांच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपासंदर्भात विधान केले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील आमदार भडकले आहेत. तर दुसरीकडे बावनकुळे यांनीही वक्तव्यावर सारवासारव केली आहे.

बावनकुळेंनी अधिकारात जेवढे आहे तेवढेच बोलावे : संजय शिरसाटअशा वक्तव्यांमुळे युतीत बेबनाव होतो, याची जाणीव बावनकुळे यांनी ठेवायला हवी.  फक्त ४८ जागा लढविण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? यासाठी वरिष्ठ पातळीवरील बैठकीत निर्णय घेतला जाईल. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात विधान केले. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच बोलले पाहिजे, असा टोला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी लगावला.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप २८८ जागा लढविणार असून शिंदे गटाचे नामोनिशाण शिल्लक राहणार नाही, असे म्हणत शिंदे गटात हवा भरण्याचे काम केले आहे.विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर एकटा भाजपच असेल. अंदाज घेऊन शिंदे गटासाठी ते केवळ ५ ते ६ जागा सोडतील. उर्वरित जागा भाजपच्या चिन्हावरच लढविल्या जातील, असेही जयंत पाटील म्हणाले.

आता सारवासारव बावनकुळे यांचा बैठकीतील व्हायरल व्हिडीओ डिलीट करण्यात आला. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे वक्तव्य केले. प्रत्यक्षात निवडणुकीच्या वेळीच जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या तयारीचा उपयोग होईल, अशी सारवासारव बावनकुळे यांनी केली.

१३० ते १४० जागा लढविणार : गायकवाडशिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढविणार आहोत. आमच्यापेक्षा भाजप मोठा पक्ष असल्याने निश्चितपणे जास्त जागा लढेल. पण, आम्ही शिवसेना म्हणून १२५ पेक्षा कमी जागा लढणार नाही. पक्षश्रेष्ठींनी बावनकुळे यांना समज द्यावी, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदे