शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येपूर्वी जिया होती गर्भवती

By admin | Updated: December 11, 2015 09:05 IST

जिया खान आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. २०१३ मध्ये आत्महत्या करणारी जिया खान मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी गर्भवती होती. प्रियकर सूरज पांचोलीने तिला गर्भपातासाठी गोळी दिली होती.

मुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. २०१३ मध्ये आत्महत्या करणारी जिया खान मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी गर्भवती होती. प्रियकर सूरज पांचोलीने तिला गर्भपातासाठी गोळी दिली होती. एवढेच नाही, तर सूरजनेच भ्रूण काढून ते टॉयलेटमध्ये फेकले, अशी धक्कादायक माहिती सीबीआयने बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्राद्वारे समोर आली आहे.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी जिया सूरजपासून गर्भवती होती. जियाच्या गर्भपातासाठी सूरज गायनाकॉलॉजिस्टकडे गेला. गायनाकॉलॉजिस्टने गभर्पातासाठी काही गोळ्या जियाला दिल्या. या गोळ्या खाल्ल्यानंतर जियाला रक्तस्त्राव झाला. त्यामुळे घाबरलेल्या जियाने सूरजला कॉल केला. सूरजने गायनाकॉलॉजिस्टला जियाकडे पाठवले. या डॉक्टरने जियाला हॉस्पिटलमध्ये आणण्यास सांगितले.गायनाकॉलॉजिस्टने सूरजला सांगितले की, गर्भपात झाला आहे, पण भ्रूण अजूनही तिच्या गर्भात आहे. रक्तस्राव थांबवण्यासाठी ते बाहेर काढणे आवश्यक आहे. सूरजने स्वत:च हे भ्रूण बाहेर काढले आणि टॉयलेटमध्ये फेकले. मात्र, डॉक्टर उपस्थित असूनही सूरजने असे का केले? याचा उल्लेख सीबीआयच्या आरोपत्रात नाही. ही बाब सार्वजनिक झाली, तर करिअरवर परिणाम होईल, अशी भीती सूरज पांचोलीला होती. त्यामुळे गभर्पात झाल्यानंतरही त्याने जियाला हॉस्पिटलमध्ये नेले नाही.जिया खानने ३ जून २०१३ रोजी गळफास घेऊन तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. जियाची आई राबियाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. जियाची हत्या झाली आहे, असा आरोप राबिया यांनी केला होता. उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. सीबीआयने ९ डिसेंबर रोजी कोर्टात आरोपपत्र दाखल केले. (प्रतिनिधी)