आभार मानण्यासाठी थँक्स म्हणत तिने हात पुढे केला. मात्र, त्याने तिला मिठीत ओढून तिच्या गालावर किस केला.
थँक्स म्हणताच त्याने इंजिनियर तरुणीला केलं किस
पुणे : मित्राला फोन केल्यानंतर फोन परत करताना तिने त्याला थॅक्स म्हणत शेकहँड केला़. तेव्हा त्याने या तरुणीचा हात पकडून भर रस्त्यावर किस घेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे़. राम बद्रीलाल दाबोडीया (वय ४३, रा. आझाद नगर, वानवड़ी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हा प्रकार कॅम्प परिसरातील अरोरा टावर्स लगतच्या फुटपाथवर मंगळवारी सायंकाळी घडली होता़. याप्रकरणी बालेवाडी येथे राहणाºया २१ वर्षाच्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही तरुणी कँप परिसरात मंगळवारी आली होती. परंतु ती रस्ता चुकली. बराच वेळ फिरल्यानंतर ती चुकीच्या मार्गावर फिरत होती. त्यावेळी तिचा मोबाइलही डिस्चार्ज झाला. दरम्यान, तिला मित्राला फोन करून मदत घ्यायची होती. त्यामुळे ती अरोरा टॉवर लगत असलेल्या फुटपाथवर आल्यावर एका व्यक्तीकडे तिने मोबाईल मागितला. त्याच्या मोबाईलवरून तिने फोन केला. फोन करून झाल्यानंतर तिने मोबाईल त्याला परत केला आणि त्याचे आभार मानण्यासाठी थँक्स म्हणत हात पुढे केला. मात्र त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि हाताचा किस घेतला. त्यानंतर तिला मिठीत ओढून तिच्या गालावरही किस केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. तेव्हा तो त्यात दिसला. तसेच त्याच्या मोबाईल नंबरवरुन पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने हा प्रकार केल्याची कबूली दिली.