शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

‘राष्ट्रवादी’च्या संघटनात्मक पुनर्रचनेचे सूतोवाच, वंचितकडे गेलेले मतदार जोडणार 'पवार'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 6:06 AM

पराभवाबाबत उमेदवारांनी केलेल्या विश्लेषणावर पवार म्हणाले की

मुंबई : पक्ष म्हणून काही ठिकाणी आपण कमी पडलो. त्याची किंमत निवडणुकीत मोजावी लागली. त्याचा विचार केला पाहिजे. संघटनात्मक काम कमी पडले. काही जिल्ह्यांत वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीकडे जबाबदारी आहे. तिथे नव्यांना संधी दिली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील संघटनात्मक बदलांचे सुतोवाच केले. मुंबई, ठाण्यासारख्या जिल्ह्यात एखाद दुसऱ्या जागीच राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. अशा ठिकाणी जास्त लक्ष देण्याची आवश्यकताही पवार यांनी बोलून दाखविली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेतील पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक झाली. विधानसभेचा निकाल संमिश्र लागला. तरूणांनी आणि अल्पसंख्याक समाज विशेषत: मुस्लिमांनी आपली शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभी केली. काय वाटेल ते झाले तरी भाजप नको असे त्यांनी ठरवले होते. शिवाय शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला, असे सांगताना काही ठिकाणी मात्र आपण मागे पडलो, अशी स्पष्ट कबुलीही शरद पवार यांनी दिली. काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे. हेलोकांनी लक्षात आणून दिल्याचे, ते म्हणाले.पराभवाबाबत उमेदवारांनी केलेल्या विश्लेषणावर पवार म्हणाले की, तुम्हाला यश आले नाही त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत व राज्यात त्यांचे सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपुर वापर सत्ताधाºयांनी केला. सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही, ही बाब समजू शकतो. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच काम न केल्याच्या तक्रारी काहींनी केल्या. माझ्याच पक्षातील कार्यकर्ता काम करत नाही. विरोधी काम करतो, त्यावेळी मी स्वत:चे काम तपासून घ्यायला हवे, असा सल्लाही पवार यांनी यावेळी उपस्थितांना दिला.पराभूत उमेदवारांकडे संबधित भागाची संघटनात्मक जबाबदारी सोपविली जाईल. त्यामाध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत त्यांनी पोहचायला हवे. पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणार आहे तुम्ही त्याचा वापर करून घ्या. महाराष्ट्रात तुम्हीच अग्रभागी आहे. हे लक्षात आणून देवू या, असे आवाहन त्यांनी केले.वंचितच्या माध्यमातून दलित संघटनच्वंचित बहुज आघाडीच्या माध्यमातून समाजातील गरीब वर्ग, दलित आणि मुस्लिम एकवटला. हा वर्ग लोकसभेत वंचितच्या पाठिशी राहिला. वंचितच्या पाठिशी असलेला मुस्लिम समाज विधानसभेत बाजुला झाला. तर नवबौद्ध आणि इतर वंचितच्यामागे उभा राहिला.च्वंचितला पाठिंबा देणारा दलित, नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजुला आहे की नाही, हे पाहिले नाही. त्यामुळेच त्याचा फटका बसला आहे. एससी व एसटी या समाजाच्या ठिकाणी संघटनात्मक काम करण्यात कमी पडलो. त्यांना पक्षात प्रतिष्ठा देतो आहे की नाही हेही पाहिले पाहिजे, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी