शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

खेळ शरद पवारांनीच सुरू केला, शेवटही तेच करतील; या लढाईत जो जिंकेल, त्याला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:37 IST

सहकाऱ्यांना विश्वास; ज्याच्या भाळावर विजयाचा टिळा, त्याच्या स्वागतासाठी भाजप सज्ज, अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पवार यांनी नेमकी कोणती खेळी केली, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सुनील चावके मुंबई/नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षाच्या या नाट्यमय घटनाक्रमावर भाजप ‘निःपक्ष’ नजर ठेवून आहे. या लढाईत जो जिंकेल, त्याला विजयी टिळा लावून ‘स्वागत’ करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. काही विशिष्ट उद्देशानेच शरद पवार यांनी राजीनामा अस्त्र वापरले आहे. खेळ त्यांनी सुरू केला आणि त्याचा शेवटही तेच करतील, असा विश्वास दिल्लीतील शरद पवार यांच्या राजकीय सहकाऱ्यांना वाटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विखुरला जाऊ नये आणि अंतर्गत कलहात सापडलेले आपले घर वाचावे आणि म्हणून शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शेवटचा पत्ता खेळला असल्याचे भाजपला वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेल्या भाजप नेत्यांच्या मते शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील रस्सीखेचीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान झाले, यात शंकाच नाही. तूर्तास आपले घर वाचवले, या समाधानापलीकडे शरद पवार यांना या रस्सीखेचीतून काहीही फायदा होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर नजर ठेवून असलेल्या भाजप नेत्यांना वाटत आहे. 

पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व कलह निर्माण झाला आहे. पवार यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब होणे मुश्कील आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल ही चार नावे चर्चेत आहेत. पण, या नावांवर सर्वांची सहमती होईलच, याची शाश्वती नाही. या संघर्षात अजित पवार बाजी मारतील आणि त्यांना भाजपच्या गळाला लावून राज्याच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करणे शक्य होईल, असे गणित भाजपच्या गोटात मांडले जात आहे.

अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पवार यांनी नेमकी कोणती खेळी केली, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. वयाच्या ८३व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पर्याय नाही, हे पवार यांनी दाखवून देण्यासाठीच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची धूर्त खेळी खेळल्याचे मानले जात आहे.

तुम्ही गैरसमज करून घेताय - अजित पवारतुम्ही एक गैरसमज करून घेताय. पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत, अशातला भाग नाही. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष आहेत खरगे; पण काँग्रेस चालली आहे सोनिया गांधींकडे बघून. त्यामुळे पवारांच्या वयाचा विचार करता, सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतो. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करेल, शेवटी साहेब म्हणजेच पक्ष आहे, हे कुणी सांगण्याचे कारण नाही. आता पवारांनी हा निर्णय घेतला आहे. ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. भावुक होऊ नका, भाकरी फिरवायची असते, असे पवारांनी सांगितले पण त्यांनी स्वतःपासून निर्णय घेतला आहे. पवार आज तरी निर्णयावर ठाम आहेत, तुम्हीही भावुक होऊन आम्हाला पर्याय नाही, असे बोलू नका, साहेब आहेतच. तुम्हा आम्हाला दुसरा पर्याय आहे का; पण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होईल, आपण सगळे त्याला साथ देऊ. साहेबांच्या डोळ्यादेखत नवा होणार अध्यक्ष तयार झाला, तर तुम्हाला का नको आहे?

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा