या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 09:12 AM2020-07-12T09:12:10+5:302020-07-12T09:21:49+5:30

Sharad Pawar Sanjay Raut Interview : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. या परिस्थितीत देशाला आज मनमोहन सिंग यांची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar Sanjay Raut Interview country needs Manmohan Singh today says Pawar | या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत

या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत

Next

मुंबई - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. या परिस्थितीत देशाला आज मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीत पवारांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)

अर्थव्यवस्थेसंबंधीच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच मनमोहन सिंग यांची हंड्रेड पर्सेंट गरज आहे. त्यांनी एक नवी दिशा दिली. या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं असं देखील पवार यांनी यावेळी सांगितलं. देशाला मनमोहन सिंगांची गरज आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली आहे. " हंड्रेड पर्सेंट गरज आहे. कारण मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर झाले तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहितीय की, त्या वेळला फायनान्शियल क्रायसेसमधून आम्ही कसे जात होतो, पण मनमोहन सिंगांनी एक नवी दिशा दिली" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

"या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं त्याचं मनमोहन सिंगांना मी श्रेय देतो तसं नरसिंह रावांनाही श्रेय देतो. या दोघांनी नेहमीच्या चौकटीचा रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि सबंध अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या तज्ञ लोकांची  मदत घेऊन मोदी साहेबांनी पावलं टाकायला हवीत. माझी खात्री आहे. अशा कोणत्याही प्रयत्नांना देश सहकार्य करेल" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच अर्थव्यवस्थेसंबंधीच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी एक गृहस्थ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, दुर्दैवाने काय झालं मला माहिती नाही. ते सोडून गेले, आता जी माणसं आहेत ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे ती सावरण्यासाठी आणखी एका मनमोहन सिंग यांची गरज आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sharad Pawar Sanjay Raut Interview country needs Manmohan Singh today says Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app