शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 14:43 IST

Amol Kolhe on Union Budget: महाराष्ट्र किंवा मुंबईबाबत अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख ने केल्याने विरोधक आक्रमक

Amol Kolhe on Union Budget: पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यामध्ये विद्यार्थी वर्ग, तरुण, शेतकरी, महिला, स्टार्टअप यांसाठी अनेकविध योजना घोषित केल्या. तसेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. कररचनेत बदल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, बिहार तसेच ओडिशा राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण महाराष्ट्र किंवा मुंबईबाबत अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेखही करण्यात आला नाही. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी चार ओळींची विडंबनपर आरती लिहिली.

निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सरकारला काहीही योजना मिळालेल्या नाही असे कोल्हे यांचे रोखठोक मत आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश म्हणजेच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या राज्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक फायदा देण्यात आला आहे असे सूचक विधान कोल्हे यांनी केले.

घालीन लोटांगण वंदीन बिहार,डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे,दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र,सरकार वाचवेन म्हणे नमो!!

अशी विडंबनपर आरती लिहून अमोल कोल्हे यांनी आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश मांडला.

ठाकरे गटाकडूनही अर्थसंकल्पावर टीकास्त्र

"या अर्थसंकल्पाला 'पंतप्रधान सरकार बचाव योजना' म्हणायला हवे. कारण त्यांना हे लक्षात आले आहे की, पुढील ५ वर्षांसाठी हे सरकार वाचवायचे असेल तर त्यांच्या मित्रपक्षांना आनंदी ठेवण्याची गरज आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष दर्जा नाकारल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना निधी दिला. केंद्राकडून महाराष्ट्राकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातून पैसा हवा आहे. परंतु, महाराष्ट्रातील विकास, योजना यांसाठी काही नाही," अशी टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारnirmala sitharamanनिर्मला सीतारामन