"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 22:55 IST2025-10-09T22:54:55+5:302025-10-09T22:55:32+5:30
Radhakrishna Vikhe Patil News: 1994 ला शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्न आला नसता दरम्यान आज सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला.

"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप
- पवन पवार
वडीगोद्री - 1994 ला शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्न आला नसता दरम्यान आज सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला. मराठा उप समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी अंतरवाली सरायटी मध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली यावेळी दोघांनी एकमेकांचा सत्कार केला जवळपास सव्वा तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे.
ही व्यक्तिगत भेट असून त्यांच्या तब्येतीची आपण विचारपूस केली असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे 2 सप्टेंबरच्या जीआर बाबत न्यायालयाने स्थगिती दिली नसून, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे असे म्हणत ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही त्यामुळे याची प्रक्रिया पुढे जाऊ द्या असा आवाहन विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केले आहे.
हैदराबाद गॅझिटिअरच्या जीआर संदर्भामध्ये प्रकरण न्यायालयात असताना, दावे दाखल करून मोर्चे काढणे योग्य नाही, असं देखील विखे पाटील ओबीसी नेत्यांना उद्देशून बोलले आहेत.
तर त्या दिवशी आपण सरकारच्या विरोधात जाणार : मनोज जरांगे पाटील
मी विखे पाटलांना स्पष्ट पणाने सांगितल आहे, मला जीआर नुसार प्रमाणपत्र पाहिजे. एक-दोन तास मी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे. विखे साहेबांमध्ये आम्हाला शंभर टक्के प्रामाणिकपणा दिसतो आहे. तो माणूस 100% गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण करेल असा आम्हाला विश्वास वाटतो ज्या दिवशी वाटणार नाही तर त्या दिवशी आपण सरकारच्या विरोधात जाणार.तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला काय घेणं पडलं राजकारणाचं जो देईल तो आमचाच अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी दिली आहे.