शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

विदर्भात भाजपला धक्का देण्यासाठी शरद पवार वापरणार 'माया'(वी) शक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 2:45 PM

कर्नाटकात माजी पंतप्रधान एच डी देवेगैाडा यांच्या जेडीएसने केलेला 'माया'(वी) शक्तीचा प्रयोग महाराष्ट्रातही करण्याचे सुतोवाच पवारांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

नवी दिल्ली : आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला धक्का देणारे राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी एक घोषणा करून सगळ्यांना चकित केलं आहे. कर्नाटकात माजी पंतप्रधान एच डी देवेगैाडा यांच्या जेडीएसने केलेला 'माया'(वी) शक्तीचा प्रयोग महाराष्ट्रातही करण्याचे सुतोवाच पवारांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात आहे. विदर्भात त्यांना कार्यकर्त्यांची म्हणावी तशी फळी उभारता आलेली नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. काँग्रेससोबत आघाडी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता पवारांना लोकसभेसाठी हवे असलेले संख्याबळ गाठणे कठीण जाणार आहे. यामुळे पवार यांनी विदर्भात ताकद वाढिवण्यासाठी मायावती यांच्या बसपची साथ घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.  नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये देवेगैाडा यांच्या जेडीएसने बसपशी युती केली  होती. तेथील त्रिशंकू स्थितीनंतर काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनाही विदर्भामध्ये बसपच्या मायावी शक्तीची मदत घ्यावीशी वाटू लागली आहे. विदर्भामध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची ताकद आहे. त्यांना शह द्यायचा असेल तर काँग्रेससोबतच बसपचीही मदत घ्यायची तयारी पवार यांनी दर्शविली आहे. बसपच्या सुप्रिमो मायावती यांच्याशी याबाबत अद्याप चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   मायावती यांना आपण नुकतेच भेटलो, त्यांनी यावेळी उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांशी असलेल्या युतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच इतर राज्यांतही अशा प्रकारची युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केल्याचे पवार यांनी सांगितले. यावर महाराष्ट्रात राष्ट्रवादी बसपला सोबत घेवून लढेल का, यावर छेडले असता, मायावती यांच्याशी अद्याप यावर चर्चा झालेली नाही. मात्र, बसपशी आघाडी झाल्यास आनंदच होईल असे सांगतानाच प्रामुख्याने विदर्भात त्याचा मोठा फायदा होईल, असे शरद पवार यांनी सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विदर्भामध्ये लोकसभेच्या 10 जागा आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र