शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शांतिनिकेतनचे उपक्रम राज्यभर राबवणार - शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:11 IST

नावीन्यपूर्ण उपक्रम, शिक्षण परिवर्तनासाठी मार्गदर्शक

सांगली : थोर विचारवंत, शांतिनिकेतनचे संस्थापक संचालक, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या विचारधारेतून सुरू असलेले शांतिनिकेतनमधील विविध उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत आहेत. राज्यभरात अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. शालेय शिक्षणाला नवीन दिशा देणारे प्रयोगशील उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन, संचालक संपत गायकवाड, उपसंचालक महेश चोथे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी प्रमुख उपस्थित होते.राज्यभरातील संस्था प्रतिनिधी व मंत्री महोदय यांची पहिल्यांदाच चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात झाली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकासासाठी शिक्षक भरती व कला, क्रीडा शिक्षकांची भरती तातडीनेे होणे आवश्यक असल्याचे संस्था प्रतिनिधींनी मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणले. यावेळी मंत्री भुसे यांनी सकारात्मकता व्यक्त करत भरतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.या चर्चासत्रात नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनचे प्रतिनिधी डी. एस. माने यांनी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्रगत संकल्पना, वक्तृत्व शैलीसाठीचा ‘बोलका’ उपक्रम, समृद्ध खेळ, सांस्कृतिक कार्यशाळा, गायन-वादन आणि मातीकाम यासारख्या संस्थेकडून वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली.यावेळी मंत्री भुसे यांनी विविध उपक्रमांची दखल घेत कौतुक केले. विविध क्षेत्रातील उपक्रम हे शांतिनिकेतनमध्ये गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहेत. याची प्रत्यक्ष दखल विभागीय शिक्षण उपसंचालक, क्रीडा संचालकांनी घेत तसा अहवाल शासनास सादर केला आहे.

अभिमानाची बाब- गौतम पाटीलशांतिनिकेतनच्या उपक्रमांना राज्यभर मान्यता मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत, याचा आनंद आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने या उपक्रमांचा व्यापक प्रसार होईल, याची खात्री आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे संचालक गौतम पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा