शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘सेझ’मधून दीड लाख रोजगारनिर्मिती होणार

By admin | Updated: October 2, 2015 04:05 IST

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये आकारास येणाऱ्या विशेष आर्थिक क्षेत्रातून (सेझ) तब्बल दीड लाख रोजगारनिर्मिती होणार आहे

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये आकारास येणाऱ्या विशेष आर्थिक क्षेत्रातून (सेझ) तब्बल दीड लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. डिसेंबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प २०१८ साली पूर्ण होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी एकूण ६५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. या सेझमुळे आसपासच्या परिसरातील औद्योगिक आणि निवासी क्षेत्राची भरभराट होईल, असा दावा जेएनपीटीने केला आहे.जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी मुंबई येथील कार्यालयात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेझ प्रकल्पाबाबतचे विविध मुद्दे विशद केले. ते म्हणाले, २७७.३८ हेक्टर भूखंडावर सेझ प्रकल्प उभारण्यात येईल. प्रकल्पासाठी केंद्राच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. भूसंपादनाबाबतही काही अडचणी नाहीत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येईल. प्रकल्पासाठी एकूण ६५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प २०१८ साली पूर्ण होईल. प्रकल्पाद्वारे प्रत्यक्षात ३ ते ४ हजार रोजगारांची निर्मिती होईल. अप्रत्यक्षरीत्या दीड लाख रोजगार निर्माण होतील. प्रकल्पांतर्गत उच्च दर्जाचे बांधकाम करण्यात येईल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतली जाईल.‘क्लीन, ग्रीन आणि स्मार्ट’ या पैलूंचे एकत्रीकरण म्हणजे हा सेझ प्रकल्प असेल. प्रकल्पामधील बांधकामांतर्गत येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राने प्रथमत: ४६८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रकल्पात ३ हजार ५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. हा प्रकल्प कार्गोलाही हातभार लावेल; आणि एकदा प्रकल्प पूर्ण झाला तर कार्गोचीही भरभराट होईल, असेही डिग्गीकर यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)