शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार किलो सोयाबीन तेल जप्त !

By admin | Updated: October 2, 2015 02:22 IST

भेसळीचा संशय; अन्न व औषध विभागाची अकोला येथे कारवाई.

अकोला: एमआयडीसीतून खुल्या बाजारात विक्रीच्या आणि भेसळ असल्याच्या संशयावरून अन्न व औषधी प्रशासनाने तीन ट्रकमधील सात हजार १९७ किलो सोयाबीन तेल जप्त केले. जप्त केलेल्या सोयाबिन तेलाची किंमत ४ लाख ३९ हजार रूपये आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास एमआयडीसी परिसरात करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी ड्रममधील तेलाचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. शासनाने खुल्या तेल विक्रीवर बंदी घातलेली असतानाही बाजारात सर्रास खुल्या तेलाची विक्री करण्यात येत आहे. एमआयडीसी भागातून ४0 ड्रममध्ये भरलेले सात हजार १९७ किलो भेसळयुक्त सोयाबीनचे तेल घेऊन तीन ट्रक खुल्या बाजारात जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना मिळाली. माहितीच्या आधारे विभागाचे साहाय्यक आयुक्त नितीन नवलकार, सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके, अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव, कर्मचारी प्रशांत अजिंठेकर यांनी एमआयडीसीमध्ये छापा घालून एमएच ३१ सीबी २९८१ क्रमांकाचा ४0७ ट्रकमधील १५ ड्रम सोयाबीन तेल आणि यवतमाळकडे जाणारा एमएच १५ जी ६९४६ क्रमांकाच्या ट्रकममधील १५ ड्रम तेल आणि यवतमाळ जिल्हय़ातील कळंब येथे एमएच ३0 क्यू ४९४२ क्रमांकाच्या बोलेरो पिकअप व्हॅनमधील १0 ड्रम तेल जप्त करण्यात आले. तेल घेऊन जाणारे तीनही ट्रक अन्न व औषध विभाग कार्यालयात आणून उभे केले आहेत. हे तेल एमआयडीसीतील अंबिका ऑईल इंडस्ट्रिज आणि मनोज मारोतराव सारवे यांच्या मालकीचे असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव यांनी दिली. तेल जप्त करून पंचनामा करण्यात आला. तेलाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहितीही यादव यांनी दिली.