शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सात एकरावरील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:20 IST

एका शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण सात एकरावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

ऑनलाइन लोकमतबोरखेड, दि. 19 - संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात शेत असलेल्या एका शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण सात एकरावर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिसरात पाऊस लांबत असल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोनाळा, सायखेड, पिंगळी, वारखेड, सगोडा, पळसोडा, दानापूर या गावात गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे अखेर जास्तीत जास्त दुबार तिबार पेरणी करण्याचे संकट कोरडवाहू शेतकऱ्यांवर येवून ठेपले आहे. तसेच काही शेतकऱ्यांची प्रथम पेरणी करण्याचे सुध्दा बाकी आहे. पुढील घर खर्च व मुलांचे शिक्षण, लग्न, कसे काय भागवावे. अशा विविध संकटात कोरडवाहू शेतकरी अडकला असतानाच, बोरखेड गावालगत गट ५३ मध्ये गोपाल व्यास या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. या शेतकऱ्याने २० जून रोजी शेतात सोयाबीनची पेरणी केली. मात्र पावसाने लांब दडी मारल्याने त्यातील बरेच बियाणे जमिनीच्या आत खराब झाले. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सोयाबीन निघेल या आशेने ते थांबले. अखेर १२ जुलै रोजी मध्यरात्रीपासून पावसाचे थोडे आगमन झाले. परिणामी शेतात जास्तीत जास्त सोयाबीन निघेल अशी आशा त्यांना होती. मात्र, १८ जुलै रोजी शेतात फेरफटका मारला असता शेतात फक्त २० टक्के सोयाबीन पीक उगवले, ताबडतोब त्यांनी दुसरे पिक घेण्याकरीता सात एकरातील सोयाबीनवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवला त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले तसेच या परिसरात दुबार तिबार पेरणी करूनही योग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. महसूल विभागाने दुबार, तिबार पेरणी केलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची यादी सरसकट तयार करून त्वरीत शासनाकडून मदत मिळण्याची मागणी कोरडवाहू शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.