शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लाखांवर जात पडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा

By admin | Updated: May 23, 2014 01:05 IST

नागपूर विभागातील तीन समित्यांनी एक वर्षात सरासरी एक लाखांवर जात पडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा केला आहे. जात पडताळणीसाठी राज्य शासनाने आॅनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला

आॅनलाईन प्रक्रिया अर्ज भरण्यापुरतीच : पडताळणीसाठी तीन समित्या

नागपूर : नागपूर विभागातील तीन समित्यांनी एक वर्षात सरासरी एक लाखांवर जात पडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा केला आहे. जात पडताळणीसाठी राज्य शासनाने आॅनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला असला तरी, ती फक्त अर्ज भरण्यापुरतीच मर्यादित आहे. इतर कामे ही पूर्वीच्याच पद्धतीने केली जात आहे. नागपूर विभागात जात पडताळणीसाठी तीन समित्या आहेत. एक नागपूर जिल्ह्यासाठी, दुसरी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी व तिसरी भंडारा, वर्धा व गोंदिया जिल्ह्यांसाठी आहे. विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस.जी. गौतम अध्यक्ष आहेत. एप्रिल २०१३ ते एप्रिल २०१४ या एक वर्षात तीनही समित्या मिळून सरासरी एक लाखांवर प्रमाणपत्रांचा निपटारा करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांचे, कर्मचार्‍यांचे, निवडणुकीसाठी आलेले व इतर कामांसाठी आलेल्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे. भंडारा-गोंदिया-वर्धा जिल्ह्याच्या समितीने (क्रमांक १) एका वर्षात त्यांच्याकडे आलेल्या एकूण प्रमाणपत्रांपैकी ३८,७९० प्रमाणपत्रे निकाली काढली. यात विद्यार्थ्यांचे ९,६५३, सेवाविषयक २४,६२३, निवडणुकीची ४,४६९ आणि इतर ४५ प्रमाणपत्रांचा समावेश आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या समितीने (समिती क्र. २) एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या काळात त्यांच्याकडे आलेल्या एकूण प्रकरणांपैकी २४,०६० प्रकरणांचा निपटारा केला. यात शैक्षणिक ६,६५७, सेवाविषयक १६,१७८, निवडणुकीशी संबंधित २६७ आणि इतर ९५८ प्रकरणांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्याच्या समितीकडे (समिती क्र. ३) २०१३-१४ या काळात शैक्षणिक १८१०, सेवाविषयक २४,१८८, निवडणुकीसाठी १३५६ अशी एकूण ४३,७२४ प्रकरणे आली होती. त्यापैकी ४२,०९९ प्रकरणे वैध ठरली तर ४८ अवैध ठरली. (प्रतिनिधी)