शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा समिती स्थापन करणार - गिरीश महाजन

By admin | Updated: March 22, 2017 02:02 IST

निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांसमवेत सोमवारी रात्री बैठक घेतली

मुंबई : निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांसमवेत सोमवारी रात्री बैठक घेतली. प्रत्येक महाविद्यालयांत सुरक्षा समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. सुरक्षा समितीमध्ये २ प्राध्यापक, ३ निवासी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असेल; शिवाय या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ प्राध्यापक असतील. या समितीची बैठक दर महिन्यास घेऊन सुरक्षाविषयक बाबींची चर्चा करून संस्थास्तरावरील उपाय अधिष्ठातांना सुचविले जातील, असा निर्णय महाजन यांनी डॉक्टरांसोबतच्या या उच्चस्तरीय बैठकीत घेतला आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, शासकीय दंत महाविद्यालय उपअधिष्ठाता डॉ. पंकजा अगळ, महाराष्ट्र राज्य मार्ड संघटनेचे सचिव डॉ. स्वप्निल मेश्राम व अन्य रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉक्टरांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत टप्प्याटप्प्याने सुरक्षारक्षक पुरविण्यात येतील. त्यातील पहिल्या टप्प्यात ५०० सुरक्षारक्षक एप्रिल २०१७च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांत पुरविण्यात येतील. त्यानंतर पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे सुरक्षारक्षक नेमण्यात येतील. एकूण १,१०० सुरक्षारक्षक ३० एप्रिलपर्यंत पुरविण्यात येतील. काही सुरक्षारक्षक शस्त्रधारी असतील, त्यांना संवेदनशील ठिकाणी नेमण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महाविद्यालयांचे सुरक्षा आॅडिट केले जाईल व त्यांनी सुचविलेल्या उपाययोजना केल्या जातील. तसेच डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करावी, रुग्णालयांमध्ये अलार्म सिस्टीम, रुग्णांना प्रवेश पास आणि निवासी डॉक्टरांना क्षयरोग व प्रसूती रजा यांविषयीही तरतूद करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)