शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोवारीकर यांचे निधन

By admin | Updated: January 3, 2015 02:53 IST

स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वाभिमानी हुंकार देण्याची सवय भारताला जडविण्यात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले.

पुण्यात अंत्यसंस्कार : अवकाश, हवामान, लोकसंख्या क्षेत्रात अमूल्य योगदानपुणे : विज्ञानाच्या प्रांतातील संशोधनाच्या बळावर अस्सल स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वाभिमानी हुंकार देण्याची सवय भारताला जडविण्यात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अग्निबाणाच्या घन इंधनाचे निर्माते, हवामानाच्या अचूक अंदाजासाठी ‘गोवारीकर मॉडेल’ची निर्मिती करणारा आणि भारतीय अस्मितेला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानाची ओळख बहाल करणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला. रविवारी अचानक रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे बंधू ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर, चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर व छायाचित्रकार अविनाश गोवारीकर हे त्यांचे पुतणे व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. गोवारीकर यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिवपद, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, अवकाश संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदी महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांना गौरविले होते.च्परदेशात डॉक्टरेट संपादन केल्यानंतर मातृभूमीच्या ओढीने ते भारतात परतले. डॉ. होमी भाभा हयात असताना १९६५ साली ते मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन केंद्रात (टीआयएफआर) रुजू झाले. पुढे त्यांनी अवकाश तंत्रज्ञान संशोधनावर लक्ष केंद्रित करावयाचे ठरविले. त्यानुसार स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या कामाला आकार देण्याचे काम त्यांनी सुरू केले. अग्निबाणासाठी घन इंधनाची निर्मिती ही त्यांनी भारताला दिलेली देणगी मानली जाते. उपग्रह भूस्थिर करता करता याच उपग्रहांच्या साह्याने मान्सूनचा अचूक अंदाज बांधण्याचे मॉडेल त्यांनी विकसित केले. ते आजही गोवारीकर मॉडेल म्हणून ओळखले जाते.