शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्षता ही भारताची गरज

By admin | Updated: May 23, 2015 00:34 IST

कुमार केतकर : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा प्रारंभ

कणकवली : भारतात विविध धर्म आणि जातीतील लोक कित्येक वर्षे सहिष्णु सहजीवन जगत आले आहेत. भारताला कोणत्याही एका धर्मात किंवा जातीमध्ये बसवू शकत नाही. धर्मनिरपेक्षता ही भारत देशाची गरज असून किंबहुना ती आधीपासूनच नांदत आलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी येथील स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील प्रारंभीचे पुष्प गुंफताना केले. सिंधुरत्न फाऊंडेशनच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन केतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुभाष चव्हाण, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परूळेकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते. ‘बदलते जग आणि धर्मनिरपेक्ष भारत’ या विषयावर केतकर पुढे म्हणाले की, आपण धर्मनिरपेक्षबद्दलचे गैरसमज डोक्यातून काढून टाकले पाहिजेत. भारतातील धर्मनिरपेक्षतेमुळे असलेले स्थैर्य उधळण्याचा कट विविध देश करत आहेत. म्हणून धर्मनिरपेक्षतेची टिंगलटवाळी सुरू आहे. भारताचा मुख्य प्रश्न विकास हा नसून धर्मनिरपेक्षता कशी टिकवावी, हा आहे. शस्त्रास्त्रांची पुरवठादार अमेरिकेनेच अफगाणिस्तानमधील तालिबानी आणि पाकिस्तानातील आयएसआयला पोसले. भारतातील तणाव टिकून राहणे अमेरिकेला हवे आहे. हा तणाव टिकून ठेवण्यासाठी अतिरेक्यांची मदत घेतली जाते. या तणावाचे मूळ अविवेकी धर्मभावनेत आहे. दहशतवादासंदर्भात इस्लामिक अतिरेकी आणि हिंदू भारताची काय भूमिका आहे याबद्दलच विचार केला जातो. जग फक्त इस्लामिक दहशतवादाच्या छायेखाली नाही. खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी १९८०च्या सुमारास ५०-६० हजार लोकांना मारले आणि भारताला वेठीस धरले होते. श्रीलंकन दहशतवादी प्रभाकरन् हा हिंदू होता. अमेरिकेतील ओक्लाहोमा इमारतीचा विध्वंस करून अनेकांना ठार मारणारी व्हाईट सुप्रिमसी संघटना श्वेतवर्णीय ख्रिश्चनांची होती, असे कुमार केतकर म्हणाले. नारायण राणे म्हणाले की, प्रगत देशांनी आपल्या विकासाचा मार्ग कसा काढला व आपण कसा काढावा यासाठी चर्चा व्हायला हवी. प्रगत देशांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)