शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

मराठी पत्रकारांना दुय्यम वागणूक

By admin | Updated: August 15, 2015 00:28 IST

मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्यासाठी स्थापित असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडूनच (एमआरव्हीसी) मराठीशी दुजाभाव केला. एमआरव्हीसीतर्फे आयोजित एका पत्रकार परिषदेसाठी

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्यासाठी स्थापित असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडूनच (एमआरव्हीसी) मराठीशी दुजाभाव केला. एमआरव्हीसीतर्फे आयोजित एका पत्रकार परिषदेसाठी एमआरव्हीसीने केवळ इंग्रजी पत्रकारांनाच निमंत्रण दिले. मराठी पत्रकारांना या परिषदेचे निमंत्रणच नव्हते. या दुय्यम वागणूकीचा मराठी वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी निषेध केला आहे. या पत्रकार परिषदेत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आपली भूमिका नसून ती एमआरव्हीसीकडून आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) ही भारतीय रेल्वेच्या आधीन असलेली कंपनी मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्यासाठी काम करते. या कंपनीचे मालकी हक्क भारतीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे ५१:४९ अशा टक्केवारीने आहेत. एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांकडून माहीती देण्याबाबत नेहमीच दुजाभाव केला जातो. याचा अनुभव मराठी आणि हिंदी पत्रकारांना पुन्हा एकदा आला. शुक्रवारी मराठी आणि हिंदी पत्रकारांना कोणतीही माहीती लागू न देता छुप्या रितीने एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सकाळी अकराच्या सुमारास पत्रकार परिषद आयोजित केली. यात फक्त इंग्रजी माध्यमांच्या पत्रकारांनाच आमंत्रण देण्यात आले. पत्रकार परिषद मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांच्या चेंबरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांनाही बोलावण्यात आले. त्याचबरोबर या परिषदेत रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मात्र याची साधी कुणकुणही मराठी वर्तमानपत्राच्या पत्रकारांना लागू दिली नाही. त्यामुळे याचा सर्व पत्रकारांकडून निषेध करण्यात आला. याविषयी पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांना विचारले असता, एमआरव्हीसीकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली.एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्हाला काही पत्रकारांना भेटायचे होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी बोलावले. यात काही गैर नाही आणि हा काही मुद्दा नाही.