नागभीड येथे भूकंपाचे सौम्य धक्के

By Admin | Updated: December 20, 2014 02:34 IST2014-12-20T02:34:32+5:302014-12-20T02:34:32+5:30

नागभीड आणि परिसरात शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे रहिवाशांत एकच खळबळ उडाली.

Seasonal earthquake at Nagbhid | नागभीड येथे भूकंपाचे सौम्य धक्के

नागभीड येथे भूकंपाचे सौम्य धक्के

नागभीड (जि़चंद्रपूर) : नागभीड आणि परिसरात शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे रहिवाशांत एकच खळबळ उडाली.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक तत्काळ घराबाहेर पडले. केवळ नागभीड शहरासह चिखल परसोडी, नवखळा, मिंथूर, मिंडाळा येथे हाच अनुभव रहिवाशांना आला़ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले हे खरे आहे.
पण त्याचा केंद्रबिंदू नागपूरपासून ८६ किमी अंतरावर उत्तरेला आहे. त्याचा अक्षांश २१.४८.२ तर रेखांश ७८.२९.४ आहे. नागभीडचा अक्षांश २०.३४.४८ तर रेखांश ७९.४१.१ असा असल्याचे नागभीडचे तहसीलदार श्रीराम मुंधडा यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Seasonal earthquake at Nagbhid