शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सक्तीचे पालन न केल्यास शाळेची मान्यता रद्द, एक लाख रुपयांचा दंड, राज्य शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:30 IST

Marathi News: राज्यातील सर्वच  शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. त्याचबरोबर त्या शाळेला एक लाख रुपयाचा दंडही करण्याची तरतूद शासनाने यासंदर्भातील आदेशामध्ये केली आहे.

मुंबई -  राज्यातील सर्वच  शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. त्याचबरोबर त्या शाळेला एक लाख रुपयाचा दंडही करण्याची तरतूद शासनाने यासंदर्भातील आदेशामध्ये केली आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविणे अनिवार्य असल्याचा निर्णय शासनाने १ एप्रिल २०२० रोजी जारी केला होता. परंतु अनेक शाळा या निर्णयाचे पालन करीत नाहीत. त्यामुळे आता मराठी सक्तीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियमानुसार स्थापन झालेल्या शाळांनाही लागू आहे. मराठी भाषा शिकविण्यासाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती त्वरित करावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे. 

शिक्षण उपसंचालकांकडे अंमलबजावणीची जबाबदारीशाळांमध्ये मराठी सक्तीची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी शिक्षण उपसंचालकांकडे देण्यात आली आहे. त्यासाठीची प्रक्रिया, अपील, दंड व अन्य तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत. मराठी सक्तीच्या निर्णयाचे पालन न केल्यास संबंधित शाळेविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सक्षम अधिकारी आणि प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक यांना अपिलीय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

अंमलबजावणीची कार्यपद्धती तपासणी पथकात अनुभवी मराठी शिक्षकांचा समावेशशाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत मराठी धोरण अंमलबजावणीची पडताळणी उल्लंघन झाल्यास शाळांना नोटीस देणारनोटीस मिळाल्यावर व्यवस्थापनाने १५ दिवसांत खुलासा करणे बंधनकारकउल्लंघन सिद्ध झाल्यास मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया व दंड शाळा व्यवस्थापनास अपिलासाठी ३० दिवसांची मुदत

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Compulsory: School Recognition Cancellation, Fine if Rules Violated

Web Summary : Maharashtra mandates Marathi in all schools, grades 1-10. Violators face recognition cancellation and ₹1 lakh fine. Education Deputy Directors oversee enforcement, including inspections, notices, and appeals.
टॅग्स :marathiमराठीMumbaiमुंबई