शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमाती प्रवर्गात शासन कधी करणार दुरुस्ती? विदर्भातील गोवारींचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 19:19 IST

आदिवासी संघटनांनी सत्यता पडताळावी 

मोहन राऊत / अमरावती : गोवारी समाज हा आदिवासी आहे. गोंडगोवारी ही जात अस्तित्वात नसून, अनुसूचित जमाती प्रवर्गात दुरुस्ती करावी, असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने दिल्यानंतर राज्य शासन आता कधी पाऊल उचलणार, असा सवाल विदर्भातील गोवारी समाजाने केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करून अध्यादेश जारी करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपूर्वीपासून गोवारी समाज हक्काचा लढा लढत आहे. आपल्या न्याय्य मागणीसाठी ११४ गोवारींचे बळी जाऊनही शासनाने गोवारी समाजाचा प्रश्न सोडविला नव्हता. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. अखेर १४ ऑगस्ट रोजी गोवारी हे आदिवासीच असल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब केला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळाला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि अध्यादेश जारी करावा, अशी मागणी आदिवासी गोवारी समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

केवळ दुरुस्तीची गरज गोवारी जमात ही गोंडाची उपजमात आहे. अर्थात कोया धर्मातून निर्माण झालेली आणि कोया बिडार (समुदायातून) निर्माण झालेली कोपाल जमात ही आजची गोवारी जमात आहे. गोवारी जमातीची संस्कृती ही गोंडीयन आहे. गोंड जमातीप्रमाणे गोवारीमध्ये सर्व रितीरिवाज पाळले जातात. नागपूर खंडपीठाने यापूर्वी लागलेल्या अनेक निकालांचा आधार घेत गोवारी हे आदिवासी असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे केवळ दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे मत याचिकाकर्त्यांनी मांडले आहे.

 अपप्रचार थांबणार कधी?सन २००२ ला गोंडराजगोंडमध्ये दुरूस्ती करण्याची राज्य शासनाने शिफारस केली होती. कारण प्रत्यक्षात त्या नावाची जमात अस्तित्वात नव्हती. गोवारींची समस्या यासारखीच आहे. गोंडराजगोंडमध्ये दुरूस्ती केली तेव्हा कोणतीही जमात नव्याने समाविष्ट केल्या गेली नाही, तर मग गोंडगोवारीमध्ये दुरूस्ती केली तर कोणतीही जमात कशी समाविष्ट होणार, याचा विचार आदिवासी संघटनांनी करण्याची गरज असल्याचे मत याचिकाकर्त्यांनी व्यक्त केले. गोंडगोवारीबाबत निर्णय देताना कोर्टाने सन १९६५ ला सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या न्यायनिवाड्याचा आधार घेतलेला आहे. विशिष्ट परिस्थितीत तो आता स्थापित कायदा झालेला आहे. त्यामुळे या निर्णयाने संसदेच्या वा राष्ट्रपतींच्या अधिकाराचे हनन झाले आहे, असा काही आदिवासी संघटना अपप्रचार करीत आहेत. ते थांबविणे गरजेचे असल्याचे मत मनीष सहारे व हेमराज नेवारे यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारnagpurनागपूरreservationआरक्षण