शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Savitribai Phule Birth Anniversary: क्रांतिसूर्य ज्योतिबाची सौभाग्यवती, तिने पेटविल्या ज्ञानज्योती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 13:38 IST

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. 

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला.

ज्योतिबा फुले म्हणजे एक थोर व्यक्तिमत्तव. महात्मा फुलेंना माहीत होते की, शिक्षणामुळेच माणूस गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. त्यातून जर आजच्या स्त्रीला तिचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर त्यासाठी तिमे शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षणामुळेच त्या अन्यायाशी प्रतिकार करण्यासाठी सक्षम होऊ शकतील, असा त्यांना विश्वास होता. पण त्यावेळी महिला आणि मुलींना शिकवण्यासाठी एका महिला शिक्षिकेची गरज होती. अशावेळी महात्मा फुलेंनी स्वतः सावित्रिबाईंना शिकविण्याची जबाबदारी घेतली. 

लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलींसाठी शिक्षणाची सोय नव्हती. आधी पती महात्मा फुलेंकडून शिकवण्या घेतल्यानंतर सावित्रीबाईंनी नॉर्मल स्कूल, छबिलदासवाडा, पुणे येथे अंकगणित, बाराखडीसोबतच इतर विषयांच्या परिक्षा दिल्या. सर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1848मध्ये त्यांनी भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. पुढे पती महात्मा फुलेंच्या साथीने सावित्रीबाईंनी शिक्षणाचा वसा असाच सुरू ठेवला. पुढे महात्मा फुलेंनी जे समाजसुधारणेचे कार्य केले त्यामध्ये सावित्रीबाईंनी त्यांना मोलाची साथ दिली. मग बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना असो किंवा शेतकरी व शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली रात्रशाळा. काही सामजकंटकांनी त्यांना घरातून हाकलूनही लावले पण तरिदेखील न डगमगता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजकार्य थांबवले नाही. सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंच्या साथीने आपलं कार्य सुरूचं ठेवलं. त्या जे शिकल्या, अनुभवलं ते त्यांनी वेळोवेळी कवितेतून मांडूनदेखील ठेवलं. 

एवढचं नव्हे तर या दाम्पत्याने जातिवादाविरोधातही बंड पुकारला होता. त्यांनी आपल्या घरातील स्वतःची विहिर सर्वांसाठी खुली करून दिली. महिला अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाईंनी विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. 1897मध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातलेलं असताना त्यांनी पुण्यामध्ये आपल्या मुलाला सोबतीला घेऊन एका हॉस्पिटलची स्थापना केली. तिथे त्यांनी समाजात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांवर उपचार केले. लोकांवर उपचार करत असतानाच स्वतः या रोगाच्या कचाट्याट सापडून सावित्रीबाईंचं निधन झालं. 

खरं तर सावित्रीबाईंनी प्रसंगी शेणगोळे देखील खाल्ले. त्यामुळेच आजच्या मुली आणि महिला स्वतंत्रपणे वावरू शकत आहेत आणि शिक्षण घेऊ शकत आहेत, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. म्हणून प्रत्येक महिला ही त्या सावित्रीचीच लेक आहे जिने स्वतः खचता खाऊन शिक्षणाचे दरवाजे त्यांचा उद्धार होण्यासाठी खुले करून दिले. 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेsocial workerसमाजसेवकTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र