शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला ‘कॅडर बेस’ पक्ष बनविण्याचा ‘सत्त्वशील’ प्रयत्न

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

सर्मपित कार्यकर्त्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय फळी उभारणार!

संतोष येलकर/अकोला गेल्या लोकसभा निवडणुकीत समोर आलेले अडथळे आगामी विधानसभा निवडणुकीत येऊ नयेत, यासाठी राज्यात काँग्रेस पक्षाला ह्यकॅडर बेसह्ण पक्ष बनविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षित सर्मपित कार्यकर्त्यांची निवड करण्याचा कार्यक्रम, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशिला चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राबविला जात आहे.काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत समोर आलेल्या अनेक अडथळ्यांमुळे कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. ते अडथळे आगामी विधानसभा निवडणुकीत येऊ नयेत, यासाठी सत्त्वशिला चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात प्रशिक्षित कार्यकर्त्यांची ह्यटीमह्ण तयार करण्याचे काम सुरू आहे. पक्ष आणि नेत्यांवरील आरोपांना योग्य प्रकारे उत्तरे देण्यासोबतच, काँग्रेसच्या ध्येय-धोरणांचा, विचारधारेचा योग्य पद्धतीने प्रचार व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पक्षहितासाठी सोशल मीडियाचा वापर करून कार्यकर्त्यांना एकत्रित करणे व पक्षाची शक्ती वाढविण्याकरिता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान दोन निष्ठावान आणि तळमळीचे कार्यकर्ते तयार करण्याचा कार्यक्रम सध्या राबविला जात आहे. काँग्रेस नेत्यांकडे कमीत-कमी चार-पाच प्रशिक्षित कार्यकर्ते असले पाहिजे, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काय केले पाहिजे, याबाबत कार्यकर्त्याला पूर्णत: जाणीव असली पाहिजे, ही या कार्यक्रमामागची प्रेरणा आहे. त्यासाठी राज्यात विभागनिहाय प्रशिक्षण वर्ग घेऊन, विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांची निवड करण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर या कार्यकर्त्यांच्या कौशल्याचा उपयोग विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी केला जाणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली. *२८८ मतदारसंघांसाठी ५७६ तळमळीचे कार्यकर्ते!राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात तळागाळापर्यंत जाऊन पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविणे, पक्षातील गटबाजी दूर करून, सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणणे व पक्षाची शक्ती वाढविण्याचे काम करण्यासाठी ह्यकॅडर बेसह्ण कार्यकर्ते तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून राज्यात सुरू आहे. त्यामध्ये विभागनिहाय प्रशिक्षण शिबिर घेऊन, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे निष्ठावान आणि तळमळीच्या कार्यकर्त्यांंची निवड केली जात आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी ५७६ तळमळीच्या कार्यकर्त्यांची निवड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.*सात प्रशिक्षकांकडून निष्ठावान कार्यकर्त्यांंची निवड!कार्यकर्त्यांंची निवड सात प्रशिक्षकांकडून केली जात आहे. विनयकुमार आवटे यांच्या नेतृत्वातील या प्रशिक्षकांच्या चमूमध्ये विरजकुमार प्रसाद, प्रल्हाद माळी, हेमंत सामंत, स्वप्नेश माळी व अशोक दुबे यांचा समावेश आहे. विभागनिहाय प्रशिक्षण शिबिरांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पाच कार्यकर्ते बोलावून, त्यापैकी दोन कार्यकर्त्यांंची निष्ठावान आणि पूर्ववेळ तळमळीचा कार्यकर्ता म्हणून निवड केली जात आहे. अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमधील कार्यकर्त्यांचे विभागीय प्रशिक्षण शनिवारी अकोल्यातील कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात पार पडले. त्यामध्ये पाचही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.*सत्त्वशिला चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी बुलडाण्यात प्रशिक्षण!अमरावती विभागातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निष्ठावान आणि तळमळीचा कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांंचे प्रशिक्षण १७, १८ व १९ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात १८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशिला चव्हाण कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.