"मोठ्या साहेबांच्या सांगण्यानुसार संजय राऊतच अजित पवारांना मविआच्या बाहेर काढणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:56 IST2023-04-21T16:54:48+5:302023-04-21T16:56:30+5:30

अजित पवारही महाविकास आघाडीतून बाहेर पडतील ते राऊतांमुळेच. शिवसेना फोडायला संजय राऊत जबाबदार आहे असा आरोप भाजपा खासदाराने केला.

Sanjay Raut will be responsible for ousting Ajit Pawar from Mahavikas Aghadi BJP MP Anil Bonde | "मोठ्या साहेबांच्या सांगण्यानुसार संजय राऊतच अजित पवारांना मविआच्या बाहेर काढणार"

"मोठ्या साहेबांच्या सांगण्यानुसार संजय राऊतच अजित पवारांना मविआच्या बाहेर काढणार"

अमरावती - अजित पवार नाराज असून ते भाजपात जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांत सुरु होत्या. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून या बातमीशी पुष्टीही केली. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी समोर येत स्पष्ट शब्दात खुलासा केला. मी भाजपात जाणार या चर्चा तथ्यहिन असून जीवात जीव असेपर्यंत पक्षाचे काम करणार असं त्यांनी म्हटलं. मात्र संजय राऊतांवर अजित पवारांनी नाव न घेता निशाणा साधला. 

आता या वादात भाजपाचे खासदार अनिल बोंडे म्हणाले की, संजय राऊतांमुळे शिवसेनेतील ४० आमदार कंटाळून गेले. अजित पवारही महाविकास आघाडीतून बाहेर पडतील ते राऊतांमुळेच. शिवसेना फोडायला संजय राऊत जबाबदार आहे, तसेच मविआ फोडायलाही संजय राऊतच जबाबदार राहतील. त्यामुळे राऊतांची थोरवी मोठी आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा मोठा वाटा आहे. आता अजित पवार यांनाही महाविकास आघाडीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या साहेबांच्या म्हणण्यानुसार, ज्यांचे ते ऐकतात सहज बाहेर काढतील. संजय राऊतांना जसं सांगितले जाते तसं ते काम करतात. मी फक्त एकाचे ऐकतो कुणाच्या बापाचे ऐकत नाही हे राऊत बोललेत. शरद पवारांचेच ऐकतो. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे राऊतांनी शिवसेना फोडली, आता महाविकास आघाडी फोडतील. सगळे व्यवस्थित, नियोजितपणे करतात त्यामुळे राज्यातील जनतेलाही करमणूक होतेय असा टोला भाजपा खासदार अनिल बोंडे यांना लगावला. 

दरम्यान, संजय राऊतांना लाज वाटायला हवी. इमरान प्रतापगढी हा त्यांच्यासोबत काँग्रेसकडून लढत होता. हा इमरान अतीक अहमदला बडा भाई म्हणतो. अतीक अहमदला गुरू मानतो. याच इमरान प्रतापगढीला काँग्रेस आमदारांनी महाराष्ट्रातून निवडून आणले. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. बाळासाहेब ठाकरेंना मानतो. आज अतीक अहमदला गुरू मानणाऱ्या इमरान प्रतापगढीच्या खांद्याला खांदा लावून संजय राऊत काम करतायेत. यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी अशी टीकाही बोंडे यांनी संजय राऊतांवर केली. 

Web Title: Sanjay Raut will be responsible for ousting Ajit Pawar from Mahavikas Aghadi BJP MP Anil Bonde