शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

Sanjay Raut: संजय राऊतांचे नवनीत राणांवर गंभीर आरोप; आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 10:28 IST

Sanjay Raut: ''लकडवालाच्या काळ्या धनातील कोट्यवधी रुपये नवनीत राणाच्या अकाउंटमध्ये आहेत."

मुंबई: हनुमान चालीसा प्रकरणात तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नवनीत राणांवर 'D' गँगशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. राऊतांनी मंगळवारी रात्री ट्विट करत नवनीत राणांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असलेल्या युसूफ लकडावालाशी आर्थिक संबंध असल्याचा दावा केलाय. त्यामुळे आता नवनीत राणा यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊतांचा भाजपला सवालआजही संजय राऊत यांनी ट्विट करत राणा दाम्पत्य आणि D गँगचा संबंध असल्याचे म्हटले आहे. ''लकडवालाला ED ने 200 कोटी रुपयांच्या मनी लांड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या काळ्या धनातील मोठा हिस्सा अजूनही नवनीत राणाच्या अकाउंटमध्ये आहे. आता ED राणांना चहा कधी पाजणार? या D गँगला का वाचवले जात आहे? भाजप आता शांत का आहे?" असे सवाल राऊत यांनी केले आहेत.

राऊत काल काय म्हणाले?नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याबाबतचा एक फोटोही राऊतांनी ट्विटरवर शेअर केलाय. युसुफ लकडावाला याचा काही दिवसांपूर्वीच तुरुंगात मृत्यू झाला होता. याच लकडावालाला ईडीने पैशांची अफरातफर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती, असे ट्विट राऊतांनी केले. यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेकडून नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नवनीत राणांच्या अडचणीत वाढराजद्रोहाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्यावर संजय राऊतांनी गंभीर आरोप केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारकडून आता नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील व्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी तक्रार दाखल केली जाऊ शकते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करेल. आता राऊतांच्या आरोपांवर नवनीत राणा काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणा