शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातून सनातनचा आश्रम हटवा!

By admin | Updated: October 1, 2015 03:12 IST

गोव्यातील रामनाथी-बांदोडा येथील सनातन संस्थेचा आश्रम स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला असून, सरकारने ७ दिवसांत आश्रम हटविण्याची मागणी बांदोडा ग्रामस्थांनी केली आहे.

फोंडा (गोवा) : गोव्यातील रामनाथी-बांदोडा येथील सनातन संस्थेचा आश्रम स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला असून, सरकारने ७ दिवसांत आश्रम हटविण्याची मागणी बांदोडा ग्रामस्थांनी केली आहे. आश्रम न हटवल्यास रामनाथ युवा संघातर्फे फोंड्यात मोर्चा काढण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी बुधवारी रामनाथी येथे पत्रकार परिषदेत दिला.काही वर्षांपूर्वी मडगावात झालेला बॉम्बस्फोट आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे पुरावे समोर येत असल्याने बांदोडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पत्रकार परिषदेस बांदोडा ग्रामपंचायतीच्या सदस्य शर्मिला लोटलीकर, दिनेश रामनाथकर, तुळशीदास नाईक व सिद्धार्थ रामनाथकर उपस्थित होते. सौरभ लोटलीकर म्हणाले, की गोव्यात कोणतीही गैरकृती न करताही सरकारने श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांच्यावर प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र रामनाथी येथील सनातन संस्थेविरुद्ध स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही आश्रमावर कोणतीही कारवाई केली जात नाही. सनातन आश्रमाला स्थानिक आमदारांचा पाठिंबा असून, त्यांच्याच आशीर्वादामुळे सदर संस्था रामनाथीत कार्यरत असल्याचा दावा लोटलीकर यांनी केला.सुमारे पाच वर्षांपूर्वी सनातन आश्रमात फोंड्यातील आयडी हॉस्पिटलमधून मोठ्या संख्येने निरोध नेल्याचे उघड झाले होते. गोव्यातील वृत्तवाहिनीवर संबंधित बातमीचे प्रसारणही झाले होते. मात्र धर्माची, हिंदू संस्कृतीची शिकवण देणाऱ्या सनातनच्या साधकांचा त्याच्याशी काय संबंध आहे, असा पवित्रा त्यावेळी संस्थेने घेतला होता. गोव्यात हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन बांधव एकोप्याने नांदत असून, सनातन गोव्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही लोटलीकर यांनी केला.रामनाथीतील सनातन आश्रम स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, एकही गावकरी संस्थेचा साधक नसल्याचे शर्मिला लोटलीकर यांनी स्पष्ट केले. संस्थेवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचा दावा दिनेश रामनाथकर यांनी केला. हिंदू धर्म आणि संस्कृती प्रसाराच्या नावाखाली आश्रमात मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये होत असून, सरकारने त्वरित आश्रम हटविण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)