Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:02 IST2025-12-12T09:01:11+5:302025-12-12T09:02:33+5:30
Samruddhi Mahamarg Accident News Today: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कारचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
Samruddhi Mahamarg Accident Latest News: साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भयंकर अपघात झाला. मालवाहू पिकअप वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने हा भीषण अपघात घडला. वाशिम जिल्ह्यातील धनज गावाजवळ गुरुवारी हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळवरून देवदर्शनासाठी भाविक शिर्डीला निघाले होते. समृद्धी महामार्गावरून जात असताना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात त्यांच्या कारचा भयंकर अपघात झाला. धनज गावाच्या हद्दीतून जात असताना एका भरधाव मालवाहू पिकअप वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला.
अपघात कसा झाला?
ब्रेक दाबल्यामुळे पिकअपचा वेग कमी झाला आणि पाठीमागून वेगात येणार कार त्यावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, पिकअप वाहन उलटले. तर कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
अपघातात कोणाचा मृत्यू?
पिकअप आणि कार अपघातात कारचालकासह आणि एकाचा मृत्यू झाला आहे. मंगेश असे कारचालकाचे नाव आहे, तर अशोकराव सौरगपते (रा.यवतमाळ) असे मृत्यू झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
अनुकूल मनोज यादव (वय ३५, रा. दत्त चौक, यवतमाळ), मयूर दीपक डोनाडकर (वय २९, रा. दत्त चौक, यवतमाळ) अशी कारमधील जखमी झालेल्यांची नावे आहेत. आणि एक व्यक्ती जखमी झाला असून, त्याचे नाव कळू शकलेले नाही. त्यांच्या सध्या कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.