शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय शुक्रवारी

By admin | Updated: October 7, 2015 01:15 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा अंतिम

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा अंतिम निर्णय शुक्रवारी दिला जाईल, असे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी मंगळवारी सांगितले. गायकवाड याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारीच संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्याला न्यायालयात हजर करून ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी संमती आहे किंवा नाही, अशी विचारणा केली जाईल. तो न्यायमूर्तींसमोर येऊन काय सांगतो, त्यावर पुढील दिशा ठरणार आहे.पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी सांगली येथे छापा टाकून अटक केली. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग चाचणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांतर्फे न्यायालयाकडे सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी सादर केला होता. त्यावर तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी, या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी शास्त्रीय पद्धती वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे समीरची ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती, तर आरोपीचे वकील अ‍ॅड. एम. एम. सुहासे यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या ५ मे २०१० च्या निर्णयाप्रमाणे आरोपी हा चाचणी करून घेण्यास इच्छुक आहे का, तसेच चाचणी करून घेण्यास त्याची संमती आहे का, या गोष्टी न्यायमूर्तींनी विचारात घ्याव्यात. त्यानंतर ब्रेन मॅपिंगची परवानगी द्यावी, असे म्हणणे मांडले होते. (प्रतिनिधी)