Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 09:32 IST2025-06-25T09:31:41+5:302025-06-25T09:32:53+5:30
Sambhajinagar Car Accident News: छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटल्याने भीषण अपघात घडला.

Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भरधाव कारने पुलावरील दुभाजकाला धडकल्याने तिघेजण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सय्यद मारुफ सय्यद माजेद (वय, १८), अरफात बागवान (वय, २०), रेहान सय्यद (सर्व रा. मोतीलालनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले पाच जण कार (एमएच २० इ जे १५८६) ने फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. मंगळवारी रात्री ११च्या सुमारास त्यांची भरधाव कारने बिल्डा गावानजीक असलेल्या पुलावरील रस्ता दुभाजकाला जोराची धडकली. त्यानंतर ही कार उलटली. यात कारमधील सय्यद मारुफ सय्यद माजेद, अरफात बागवान व रेहान सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला, तर सय्यद उजेफ व शेख शारीक हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे हे कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.