शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

रेषांमधून डोकावणाऱ्या व्यंगाला सलाम...!

By admin | Updated: May 5, 2016 21:03 IST

एरवी दररोज आपण वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रांचा आनंद घेत असतो. त्यावर खळखळून हसतो आणि व्यंगचित्रकाराच्या कल्पकतेला सलाम ठोकतो.

एरवी दररोज आपण वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रांचा (कार्टून) आनंद घेत असतो. त्यावर खळखळून हसतो आणि व्यंगचित्रकाराच्या (कार्टुनिस्ट) कल्पकतेला सलाम ठोकतो. परंतु आजचा दिवस मात्र खास व्यंगचित्रकारांसाठीच आहे. साऱ्या जगात ५ मे हा ‘व्यंगचित्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारण ५ मे १८९५ या दिवशी जोसेफ पुलित्झर यांच्या न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये हास्य आणि व्यंगाची उधळण असलेल्या ‘द येलो कीड’ या कॉमिकचे प्रकाशन झाले होते. त्याचे निर्माते होते रिचर्ड एफ.आऊटकल्ट. ‘द येलो कीड’ला वर्तमान युगातील कार्टुनचा प्रारंभ मानला जातो. त्यामुळेच आजचा हा दिवस व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यातून रेखाटल्या गेलेल्या रेषांमधील व्यंगाच्या प्रखर तितक्याच बोचऱ्या अभिव्यक्तीला सलाम करण्याचा दिवस आहे.

लोकमत समूहाने व्यंगचित्रांची महती आणि त्याच्या शक्तीची नेहमीच प्रशंसा केली आहे. समूहाद्वारे प्रकाशित मराठी दैनिक लोकमत, हिंदी दैनिक लोकमत समाचार आणि इंग्रजी दैनिक लोकमत टाइम्स ही तीनही वृत्तपत्रे देशातील दिग्गज व्यंगत्रिकारांची व्यंगचित्रे आपल्या पानावर असावीत यासाठी सदैव प्रयत्नशिल असतात. लोकमत समूह हा भारतातील असा एकमेव समूह आहे ज्याने महान कार्टुनिस्ट आर.के. लक्ष्मण यांची सदाबहार व्यक्तिरेखा ‘कॉमन मॅन’ला एक दिवसासाठी आपल्या वृत्तपत्राचे ‘गेस्ट एडिटर’बनविले होते. दिवस होता ५ फेब्रुवारी २०१२. हा एक अत्यंत आगळावेगळा प्रयोग होता.आर.के. लक्ष्मण यांना लोकमत समूहाबद्दल नेहमीच आत्मीयता होती. लोकमत टाइम्सच्या पहिल्या अंकासाठी (२१ आॅक्टोबर १९९२) त्यांनी शुभेच्छांसह एक कार्टुन भेट दिले होते. आर.के. लक्ष्मण आज आमच्यात नाहीत. परंतु त्यांची व्यंगचित्रे मात्र आजही अजरामर आहेत. मुळात व्यंगचित्रकाराचे हेच वैशिष्ट्य आहे. तो वर्तमानात ज्या व्यंगचित्राची निर्मिती करतो त्यात भविष्याचे कथन दडून असते.व्यंगचित्रकार दिनानिमित्त लोकमत समूहातर्फे आपल्या वाचकांना व्यंगचित्रकारांच्या या अनोख्या जगाची सफर घडविण्यात येत आहे. आज हयात नसलेले त्याचप्रमाणे ज्यांचे कुंचले सतत सक्रिय आहे अशा सर्व व्यंगचित्रकारांना जाणून घेता येणार आहे.व्यंगचित्रकारदिनी सर्व व्यंगचित्रकारांना लोकमत समूह सलाम करतो. विशेष पान....