विदर्भ, खान्देशात बनावट खताची विक्री

By Admin | Updated: June 2, 2015 01:40 IST2015-06-02T01:40:57+5:302015-06-02T01:40:57+5:30

विदर्भ, खान्देश आणि मध्य प्रदेशात १७ लाख ७४ हजार ५८५ रुपयांच्या बनावट खताची विक्री झाल्याचे पोलिस तपासात उघड.

Sales of counterfeit fertilizers in Vidarbha and Khand | विदर्भ, खान्देशात बनावट खताची विक्री

विदर्भ, खान्देशात बनावट खताची विक्री

मूर्तिजापूर (अकोला) : बनावट विद्राव्य खत बनविण्याच्या कारखान्यातून विदर्भ, खान्देश आणि मध्य प्रदेशात १७ लाख ७४ हजार ५८५ रुपयांच्या बनावट खताची विक्री करण्यात आल्याची माहिती सोमवारी पोलीस तपासादरम्यान उजेडात आली. मूर्तिजापूर येथे बनावट खत बनविण्याच्या गोरखधंद्याचा गुणनियंत्रण जिल्हास्तरीय भरारी पथकाने शनिवारी पर्दाफाश केला होता. प्रतीकनगरातील सुजित धूतच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यात बनावट खताचा साठा, खत तयार करण्याची यंत्रे, स्टिकर्स, बॅनर्स व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. आरोपी सुजित धूत याला रविवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी सुजित धूत २00९ पासून बनावट खत तयार करत आहे. त्याने ह्यजय अग्रो इनपुटह्ण नावाने बिलबुकही छापले होते. त्याच्याकडे खताची निर्मिती अथवा विक्री करण्याचा कोणताही परवाना नव्हता. धूत बनावट खताचे पोते कृषी केंद्रांना केवळ ५0 रुपयांना विकत होता, तर नामांकित कंपनीचे दर्जेदार खताचे पोते १५0 रुपयांना मिळते. बनावट खत विक्रीत दुकानदारही गब्बर झाले आहेत. चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसरमध्ये बनावट खताची विक्री झाली आहे.

Web Title: Sales of counterfeit fertilizers in Vidarbha and Khand