शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांच्या नावावर बोगस सोयाबीन बियाणे विक्री

By admin | Updated: May 26, 2014 01:01 IST

पश्‍चिम विदर्भातील एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा कॅश करण्यासाठी काही दलाल-विक्रेत्यांनी नवा फंडा शोधून काढला आहे. तीन हजार रुपये क्विंटलचे सोयाबीन खरेदी करून ते पिशव्यांमध्ये भरले

यवतमाळ : पश्‍चिम विदर्भातील एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा कॅश करण्यासाठी काही दलाल-विक्रेत्यांनी नवा फंडा शोधून काढला आहे. तीन हजार रुपये क्विंटलचे सोयाबीन खरेदी करून ते पिशव्यांमध्ये भरले जात आहे. त्यावर नामांकित कंपन्यांचा टॅग लावून हेच सोयाबीन बियाणे म्हणून आठ हजार रुपये क्विंटलने बाजारात विकले जात आहे.

विशेष असे, या बियाण्यांवर कोणतीही प्रक्रिया केलेली नसून त्याची उगवण क्षमताही तपासली गेली नसल्याने हे बियाणे कृषी खात्याकडून बोगस असल्याचे शिक्कामोर्तब केले जात आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात खरीप लागवड क्षेत्रापैकी ५0 टक्के अर्थात १६ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीन खाली येणार आहे. त्यासाठी १२ लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. परंतु विविध मार्गाने प्रयत्न करूनही केवळ दहा ते ११ लाख क्विंटल एवढेच बियाणे उपलब्ध होत आहे.

उर्वरित एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी काही बियाणे कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या फसवणुकीचा प्रयोग सुरू केला आहे. बुलडाणा, अमरावती तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट व वादळी पाऊस झाला नाही किंवा कमी प्रमाणात झाला. तेथील सोयाबीनची गुणवत्ता चांगली होती. तेथून तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने बियाणे कंपन्या सोयाबीनची खरेदी करीत आहे. हेच सोयाबीन बियाणे म्हणून बॅगमध्ये भरले जात आहे. त्यावर नामांकित कंपन्यांचा टॅग लावून हेच सोयाबीन प्रति क्विंटल आठ हजार रुपये दराने बियाणे म्हणून शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हा गोरखधंदा यवतमाळसह पाचही जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. या बोगस बियाण्यांची जबाबदारी विक्रेत्याच्या डोक्यावर टाकली जात आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल पश्‍चिम विदर्भातील बियाणे बाजारात सुरू आहे.

बियाण्यांच्या नावाखाली कोणतीही उगवण क्षमता न तपासलेले, प्रक्रिया न केलेले सोयाबीन विकले जात आहे. या बोगस बियाण्यांवर कृषी खात्याचे थेट नियंत्रण नसल्याने कारवाईसाठी अडचणी येत आहेत. कृषी विभाग अशा बियाण्यांचे नमुने घेतो, त्यात त्याची उगवण क्षमता ७0 टक्क्यापेक्षा अधिक असल्यास कारवाई करता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)